Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 16:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 तथापि त्यांच्यापैकी कित्येकांनी मोशेचे न ऐकता त्यातले काही सकाळपर्यंत ठेवले तेव्हा त्यात किडे पडून त्याची घाण येऊ लागली; त्यावरून मोशे त्यांच्यावर रागावला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 परंतु लोकांनी मोशेचे ऐकले नाही, काही लोकांनी त्या अन्नातून सकाळपर्यंत ठेवले त्यामध्ये किडे पडले व त्याची घाण येऊ लागली. त्यावरून मोशे त्यांच्यावर फार रागावला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 तरीही काहींनी मोशेच्या शब्दाकडे लक्ष दिले नाही; व त्याचा काही भाग सकाळपर्यंत ठेवला, पण त्यात किडे पडून त्याला दुर्गंधी सुटली होती, तेव्हा मोशे त्यांच्यावर रागावला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 16:20
13 Iomraidhean Croise  

मोशेने त्यांना सांगितले की, “कोणीही ह्यांपैकी काहीएक सकाळपर्यंत ठेवू नये.”


ह्या प्रकारे ते नित्य सकाळी आपापल्या आहाराप्रमाणे गोळा करीत; आणि उन्हाचा ताप वाढला म्हणजे ते वितळून जाई.


मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते सकाळपर्यंत ठेवले; पण त्याची घाण सुटली नाही की त्यात किडे पडले नाहीत.


मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता.


तेव्हा मोशेचा कोप भडकला. तो परमेश्वराला म्हणाला, “त्यांच्या अर्पणाची दखल घेऊ नकोस; मी त्यांचे एक गाढवही घेतलेले नाही.”


पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका; तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात;


ते पाहून येशूला फार वाईट वाटले; आणि तो त्यांना म्हणाला, “बालकांना माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.


मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, “हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला.


आणखी त्याने त्यांना म्हटले, “सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.”


जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा; तसेच स्वर्गातील अक्षय धनाच्या जीर्ण न होणार्‍या थैल्या आपणांसाठी करून ठेवा; तेथे चोर येत नाही व कसर लागत नाही.


तुम्ही रागवा, परंतु पाप करू नका; तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये;


तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे; कारण त्याने स्वतः म्हटले आहे, “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan