Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 16:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 हे पडलेले दंव सुकून गेले तेव्हा त्या रानातील सर्व भूमीवर खवल्यासारखे हिमकणाएवढे बारीक कण पसरलेले नजरेस पडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 सूर्य उगवल्यावर दव विरून गेले, परंतु त्यानंतर जमिनीवर खवल्यासारखे हिमकणाएवढे सूक्ष्म कण पसरलेले दिसले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 जेव्हा दवबिंदू नाहीसे झाले, तेव्हा रानातील भूमीवर हिमकणांएवढे खवल्यांसारखे बारीक तुकडे पसरलेले दिसू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 16:14
7 Iomraidhean Croise  

आणि त्यांची क्षुधा भागवण्यासाठी तू आकाशातून त्यांना अन्न दिले, त्यांची तृषा शमवण्यासाठी खडकातून पाणी काढले आणि त्यांना अशी आज्ञा केली की जो देश तुम्हांला देण्यासाठी मी बाहू उभारून आणभाक केली आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तुम्ही त्यात जा.


त्यांनी अन्न मागितले तेव्हा त्याने लावे पक्षी आणले, आणि स्वर्गीय अन्नाने त्यांना तृप्त केले.


तो लोकरीसारखे हिम पाडतो; राखेसारखे दवाचे कण पसरतो.


खाण्यासाठी त्याने त्यांच्यावर मान्न्याचा वर्षाव केला; आणि त्यांना स्वर्गातले धान्य दिले.


इस्राएल लोकांनी त्या अन्नाचे नाव मान्ना1 ठेवले. ते धण्यासारखे पांढरे असून त्याची चव मध घालून केलेल्या पोळीसारखी होती.


मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्‍या प्रत्येक वचनाने जगेल ह्याची जाणीव तुला व्हावी म्हणून त्याने तुला लीन केले; तुझी उपासमार होऊ दिली, आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan