Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 15:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 त्याने परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने त्याला एक झाड दाखवले, ते त्याने पाण्यात टाकल्यावर पाणी गोड झाले. तेथे परमेश्वराने2 त्यांच्यासाठी विधी व नियम लावून दिला; त्यांना कसोटीस लावले आणि म्हटले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 मोशेने परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने त्यास एक वनस्पती दाखवली. ती त्याने पाण्यात टाकल्यावर तेव्हा ते पाणी गोड झाले. त्या वेळी परमेश्वराने इस्राएल लोकांस विधी व नियम लावून दिला; तसेच त्याने त्यांचा विश्वासाची कसोटी घेतली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 तेव्हा मोशेने याहवेहचा धावा केला आणि याहवेहने त्याला लाकडाचा एक तुकडा दाखविला. त्याने तो पाण्यात टाकला आणि पाणी पिण्यास योग्य झाले. त्या ठिकाणी याहवेहने त्यांना पारखण्यासाठी नियम व सूचना दिल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 15:25
26 Iomraidhean Croise  

मग तो पाण्याच्या झर्‍यानजीक गेला व त्यात ते मीठ टाकून म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, मी हे पाणी चांगले करतो, ह्यापुढे ह्याने मृत्यू येणार नाही व पीक बुडणार नाही.”


अलीशा म्हणाला, “थोडे सपीठ आणा, ते त्याने त्या बहुगुण्यात टाकून त्यांना म्हटले, आता ह्या लोकांना ते वाढा म्हणजे ते ते खातील.” मग त्या बहुगुण्यात काही अपायकारक पदार्थ राहिला नाही.


देवाच्या माणसाने विचारले, “ती कोठे पडली?” त्याने ती जागा दाखवल्यावर अलीशाने एक लाकूड तोडून तेथे टाकले तेव्हा लोखंड पाण्यावर तरंगू लागले.


आणि संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील.“


कारण हे देवा, तू आम्हांला पारखले आहेस; रुपे गाळतात तसे तू आम्हांला गाळून पाहिले आहेस.


तू संकटात असता आरोळी केली तेव्हा मी तुला सोडवले; मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थलातून उत्तर दिले; मरीबाच्या जलांजवळ मी तुला पारखले. (सेला)


तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याजवळ राहीन; मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन;


त्याच्या याजकांपैकी मोशे व अहरोन, आणि त्याच्या नावाचा धावा करणार्‍यांपैकी शमुवेल, ह्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यांना उत्तर दिले.


फारो नजीक येऊन ठेपला; इस्राएल लोकांनी टेहळणी करून पाहिले तर मिसरी लोक आपल्या पाठोपाठ येत आहेत असे त्यांना दिसले; तेव्हा त्यांना फार भीती वाटली. ते परमेश्वराचा धावा करू लागले.


तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, “पाहा, मी आकाशातून तुमच्यासाठी अन्नवृष्टी करीन; आणि लोकांनी बाहेर जाऊन एकेका दिवसाला पुरेल इतके जमा करावे, ह्यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही ह्याविषयी मी त्यांची परीक्षा पाहीन.


मोशेने परमेश्वराचा धावा करून म्हटले, “ह्या लोकांना मी काय करू? हे तर मला जवळजवळ दगडमार करायला तयार झाले आहेत.”


तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका. कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्या मनात राहून तुम्ही पाप करू नये ह्यासाठी देव आला आहे.


रुपे मुशीत व सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदये पारखतो.


मग परमेश्वर मला म्हणाला, “मोशे व शमुवेल हे माझ्यापुढे उभे राहिले तरी माझे अंतःकरण ह्या लोकांकडे वळायचे नाही; त्यांना माझ्या दृष्टीसमोरून घालव, त्यांना निघून जाऊ दे.


ह्यासाठी सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “पाहा, मी त्यांना गाळून पारखीन; माझ्या लोकांच्या कन्येच्या वर्तनास्तव मी दुसरे काय करणार?


परत येत असता नदीच्या दोन्ही तीरांवर बहुत झाडे असलेली मी पाहिली.


तो मला म्हणाला, “हे पाणी पूर्वप्रदेशांकडे वाहत जाते आणि तेथून अराबात उतरून समुद्राकडे जाते; ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी निर्दोष होते.


कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे; पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणांस तो देवाचे सामर्थ्य असा आहे.


तरी त्या संदेष्ट्याचे किंवा त्या स्वप्न पाहणार्‍याचे तुम्ही ऐकू नका; कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने प्रीती करता की नाही हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमची ही अशी परीक्षा पाहत आहे.


तुला लीन करावे व कसोटीस लावून शेवटी तुझे कल्याण करावे म्हणून तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले.


तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही ह्याची कसोटी पाहावी म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने गेली चाळीस वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले ह्याचे स्मरण कर.


पण त्यांच्याकरवी मी इस्राएलाची परीक्षा करीन आणि त्यांचे पूर्वज माझ्या मार्गाने चालत होते त्याप्रमाणेच ते चालतात की नाही हे पाहीन.”


इस्राएलांपैकी ज्यांना कनान देशातील युद्धांचा अनुभव नव्हता त्यांना कसास लावण्यासाठी


परमेश्वराने मोशेच्या द्वारे इस्राएलाच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञा ते पाळतात की नाही ह्याची परीक्षा त्यांच्याकरवी घेण्यासाठी परमेश्वराने त्यांना मागे ठेवले होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan