Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 15:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 आणि मिर्यामेने त्यांच्या गाण्याला ध्रुपद धरले, “परमेश्वराला गीत गा, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे. घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 मिर्यामने त्यांच्या गाण्याला ध्रुपद धरले. “परमेश्वरास गीत गा; कारण त्याने महान कृत्ये केली आहेत. त्याने घोडा व स्वार यांना समुद्रात फेकून दिले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 मिर्यामने त्यांच्यासाठी गाईले: “याहवेहप्रीत्यर्थ गीत गा, कारण ते अत्युच्च आहेत. घोडे व त्यांचे स्वार त्यांनी समुद्रात बुडवून टाकले आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 15:21
17 Iomraidhean Croise  

गथात हे सांगू नका, अष्कलोनच्या आळ्यांत हे जाहीर करू नका; पलिष्ट्यांच्या कन्या आनंदित होतील, बेसुंत्यांच्या कन्या जयघोष करतील; असे न होवो.


दावीद सणाचे एफोद कंबरेस वेष्टून परमेश्वरासमोर आवेशाने नृत्य करत चालला.


कर्णे वाजवणारे व गाणारे एका सुराने परमेश्वराची स्तुती व धन्यवाद करू लागले, आणि कर्णे, झांजा आदिकरून वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुती ते उच्चस्वरे करू लागले; ती अशी : “तो उत्तम आहे, त्याची दया सनातन आहे.” तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले.


हे याकोबाच्या देवा, तुझ्या धमकीने रथ व घोडा ह्यांना गाढ निद्रा लागली आहे.


तेव्हा मोशे आणि इस्राएल लोक ह्यांनी परमेश्वराला हे गीत गाईले; ते म्हणाले, “मी परमेश्वराला गीत गाईन, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे; घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत.


फारोचे रथ व त्याची सेना ही त्याने समुद्रात टाकून दिली आहेत; त्याचे निवडक सरदार तांबड्या समुद्रात बुडाले आहेत.


ते राजासनासमोर आणि चार प्राणी व वडील ह्यांच्यासमोर जसे काय ‘एक नवे गीत गात होते;’ ते गीत पृथ्वीवरून विकत घेतलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोक ह्यांच्याशिवाय कोणाला शिकता येत नव्हते.


‘ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत,’ व ‘कोकर्‍याचे गीत’ गाताना म्हणतात, “हे ‘प्रभू’ देवा, हे सर्वसमर्था, ‘तुझी कृत्ये थोर व आश्‍चर्यकारक आहेत;’ ‘हे राष्ट्राधिपते,’ ‘तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत.’


ते ‘नवे गीत गाऊन’ म्हणतात : “तू गुंडाळी घेण्यास व तिचे शिक्के फोडण्यास योग्य आहेस; कारण तू वधला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्यांमधून 1आमच्या ‘देवासाठी’ विकत घेतले आहेत


राजेहो, ऐका; अधिपतींनो लक्ष द्या, मी स्वतः परमेश्वराला गाईन; इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची स्तोत्रे गाईन.


त्या पलिष्ट्याचा वध करून दावीद परतल्यावर लोक माघारी येत असता इस्राएलाच्या सर्व नगरांतून स्त्रिया बाहेर निघाल्या आणि डफ व झांजा वाजवून मोठ्या आनंदाने गात व नाचत शौल राजाला सामोर्‍या आल्या.


नृत्य करणार्‍या स्त्रिया आळीपाळीने येणेप्रमाणे म्हणत : “शौलाने हजारो वधले, दाविदाने लाखो वधले.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan