Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 15:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तू त्यांना आपल्या वतनाच्या डोंगरावर आणून लावशील; हेच, हे परमेश्वरा, तू आपल्यासाठी केलेले निवासस्थान आहे; हेच, हे प्रभू, तुझ्या हातांनी स्थापिलेले पवित्रस्थान आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 तू तुझ्या लोकांस तुझ्या वतनाच्या पर्वतावर घेऊन जाशील; हे परमेश्वरा, तू आपल्यासाठी केलेले निवासस्थान हेच आहे. हे प्रभू, तुझ्या हातांनी स्थापिलेले तुझे पवित्र स्थान हेच.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 तुम्ही त्यांना आत, तुमच्या वतनाच्या पर्वतावर आणून रोपणार; तेच ठिकाण याहवेह, जे तुम्ही आपल्या निवासासाठी तयार केले, ते पवित्रस्थान जे, हे प्रभू, तुमच्या हातांनी प्रस्थापित केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 15:17
24 Iomraidhean Croise  

मी आपल्या इस्राएल लोकांसाठी एक स्थान नेमून देईन; मी तेथे त्यांना रुजवीन म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करून राहतील व ते तेथून पुढे कधी ढळणार नाहीत.


तुझ्यासाठी निवासस्थान, तुला युगानुयुग राहण्यासाठी मंदिर मी बांधले आहे.”


तेव्हा यहूदा त्याचे पवित्रस्थान झाला, इस्राएल त्याचे राज्य झाला.


तो म्हणेल, “मी आपल्या पवित्र सीयोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे.”


तू आपल्या हाताने राष्ट्रांना घालवून तेथे ह्यांना स्थापले; त्या लोकांना क्लेश देऊन ह्यांचा विस्तार केला.


देवाला निवासासाठी जो पर्वत आवडला, त्याच्याकडे, हे अनेक शिखरांच्या पर्वता, तू वक्रदृष्टीने का पाहतोस? त्याच्यावरच परमेश्वर खरोखर सदोदित राहील.


शालेमात त्याचा मंडप आहे; व सीयोनेत त्याचे निवासस्थान आहे.


जे रोप तू आपल्या उजव्या हाताने लावले, जी शाखा तू स्वतःसाठी मजबूत केली तिचे संगोपन कर.


मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणला; आणि राष्ट्रांना घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लावला.


तू आपल्या उद्धरलेल्या लोकांना स्वकरुणेने नेले आहे; आपल्या बलाने तू त्यांना आपल्या पवित्र निवासाकडे घेऊन गेला आहेस.


पाहा, वाटेने तुला सांभाळण्याकरता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोचवण्याकरता मी एक दूत तुझ्यापुढे पाठवत आहे.


मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान तयार करावे.


आता तू जा, ज्या स्थलाविषयी मी तुला सांगितले आहे तिकडे त्यांना घेऊन जा. माझा दूत तुझ्यापुढे चालेल; तरी ज्या दिवशी मी झडती घेईन त्या दिवशी त्यांच्या पापाबद्दल त्यांचा समाचार घेईन.”


मी तर तुला उत्कृष्ट जातीची उत्तम द्राक्षलता अशी लावली, ती तू माझ्यासमोर विजातीय हीन जातीची द्राक्षलता अशी कशी झालीस?


सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो की, “मी यहूदा देशाचा व त्यातील नगरांचा बंदिवास उलटवीन तेव्हा ह्या देशात लोक पुन्हा हे आशीर्वचन म्हणतील : हे नीति-मत्तेच्या निवासा, पावित्र्याच्या गिरी, परमेश्वर तुझे कल्याण करो!


मी त्यांच्याविषयी आनंद पावून त्यांचे कल्याण करीन व मी मनापासून जिवाभावाने त्यांची ह्या देशात खरोखर लागवड करीन.


आणखी मी त्यांच्याबरोबर शांततेचा करार करीन, तो करार सर्वकाळचा होईल; मी त्यांना वसवीन, त्यांची संख्या वाढवीन, आणि सर्वकाळ राहील असे माझे पवित्रस्थान त्यांच्यामध्ये स्थापीन.


माझे पवित्रस्थान त्यांच्यामध्ये सर्वकाळ राहील, तेव्हा राष्ट्रांना समजेल की इस्राएलास पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.”


ते राष्ट्रांना डोंगरावर बोलावतील; तेथे ते योग्य यज्ञ करतील, कारण ते समुद्रांतले धन आणि वाळूतले गुप्तनिधी काढून घेतील.’


तुमच्या वतनाची भूमी अपवित्र असली तर परमेश्वराचा निवासमंडप जेथे आहे त्या परमेश्वराच्या वतनाच्या देशात नदीपार येऊन आमच्यामध्ये वतन घ्या, पण आपला देव परमेश्वर ह्याच्या वेदीखेरीज अन्य वेदी बांधून परमेश्वराविरुद्ध बंड करू नका आणि आमच्याविरुद्धही बंड करू नका.


Lean sinn:

Sanasan


Sanasan