निर्गम 15:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 भीती व दहशत त्यांना घेरतात; तुझ्या बाहुपराक्रमाने ते दगडाप्रमाणे निश्चल झाले आहेत; हे परमेश्वरा, तुझे लोक पार जाईपर्यंत, तू खरेदी केलेली प्रजा पार निघून जाईपर्यंत असे होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तुझे सामर्थ्य पाहून ते लोक घाबरतील, आणि परमेश्वराचे लोक म्हणजे तू तारलेले लोक निघून पार जाईपर्यंत ते तुझ्या लोकांस काहीही न करता, दगडासारखे एकाच जागी उभे राहतील; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तुमच्या बाहूच्या पराक्रमामुळे भीती व दहशत त्यांच्यावर येऊन पडेल. तुमचे लोक पार करेपर्यंत, हे याहवेह, जे लोक तुम्ही खंडून घेतले आहेत, ते पार होईपर्यंत ते दगडाप्रमाणे स्तब्ध राहतील. Faic an caibideil |
तुझ्या इस्राएल प्रजेसमान भूतलावर दुसरे कोणते तरी राष्ट्र आहे काय? आपली प्रजा करून घेण्यासाठी इस्राएलास सोडवण्यास तू गेलास, आपले नाव केलेस, त्यांच्यासाठी महत्कृत्ये केलीस, आपल्या लोकांना मिसर देशातून इतर राष्ट्रांच्या व देवांच्या हातांतून सोडवून घेतले आणि त्यांच्यादेखत आपल्या देशासाठी भयानक कृत्ये केलीस; असे करायला कोणत्या राष्ट्राचा देव गेला होता?