Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 15:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तेव्हा अदोमाचे अधिपती हैराण झाले; मवाबाचे नायक थरथरा कापत आहेत; सर्व कनानवासी गलित झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मग अदोमाचे अधिकारी हैराण झाले. मवाबाचे नायक भीतीने थरथर कापत आहेत आणि कनानी लोक गलित झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 एदोमाचे अधिकारी घाबरून जातील, मोआबाचे पुढारी थरथर कापू लागतील, कनानातील लोक वितळून जातील;

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 15:15
24 Iomraidhean Croise  

एसाव वंशांतले सरदार झाले ते हे : एसावाचा पहिला मुलगा अलीपाज; ह्याचे मुलगे सरदार तेमान, सरदार ओमार, सरदार सपो, सरदार कनाज,


सरदार कोरह, सरदार गाताम व सरदार अमालेक; अदोम देशात अलीपाज ह्याच्या पोटी हे सरदार झाले. हे आदेचे मुलगे.


एसाव वंशांतील सरदारांची नावे, कुळे व राहण्याच्या ठिकाणांवरून असलेली नावे ही : सरदार तिम्ना, सरदार आल्वा, सरदार यतेथ,


म्हणजे जो धैर्यवान आहे, ज्याचे हृदय सिंहासारखे आहे, अशा पुरुषाचीही गाळण उडेल; कारण सर्व इस्राएल लोकांना ठाऊक आहे की तुझा बाप लढवय्या असून त्याच्याबरोबरचे लोकही वीर आहेत.


हे नगर पाहताच ते विस्मित झाले, व घाबरे होऊन पळत सुटले.


जसा धूर पांगतो तशी त्यांची पांगापांग कर; जसे मेण अग्नीपुढे ठेवले असता वितळते तसे दुष्ट देवापुढे नष्ट होवोत;


ह्यामुळे सर्वांचे बाहू गळले आहेत, प्रत्येकाचे हृदय विरघळले आहे;


मिसर देशाविषयीची देववाणी; परमेश्वर शीघ्रगती मेघावर आरूढ होऊन मिसराकडे येत आहे; मिसरातील मूर्ती त्याच्यासमोर कापत आहेत आणि मिसराचे हृदय आतल्या आत विरघळत आहे.


दिमिष्काविषयी : “हमाथ व अर्पाद फजीत झाले आहेत; त्यांनी वाईट वर्तमान ऐकले आहे, त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले आहे; समुद्र क्षुब्ध झाला आहे; तो शांत होऊ शकत नाही.


आणि ‘उसासा का टाकतोस?’ असे तुला कोणी विचारतील तेव्हा त्यांना सांग की, ‘ही वार्ता प्रत्ययास येत आहे म्हणून; तेव्हा सर्वांची मने खचतील, सर्वांचे हात निर्बल होतील, सर्वांचा उत्साह विरेल, सर्वांच्या गुडघ्यांचे पाणी होईल; पाहा, ती प्रत्ययास येत आहे, तिच्याप्रमाणे खास घडेल,”’ असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


ती रिकामी, शून्य व ओसाड झाली आहे; तिच्या हृदयाचे पाणीपाणी झाले आहे, तिचे गुडघे लटपटत आहेत, सर्वांच्या कंबरेत कळा निघत आहेत, त्या सर्वांचे चेहरे फिक्के पडले आहेत.


तो उभा राहिला म्हणजे पृथ्वी हेलकावे खाते; तो नजर टाकून राष्ट्रांना उधळून लावतो. सर्वकाळचे पर्वत विदीर्ण होतात, युगानुयुगीचे डोंगर ढासळतात, त्याचा हा पूर्वकाळापासून प्रघात आहे.


कूशानाचे डेरे विपत्तीने घेरलेले मी पाहिले; मिद्यान देशाच्या कनाती थरथरत आहेत.


आणि लोकांना आज्ञा कर की, सेईरचे रहिवासी तुमचे भाऊबंद जे एसावाचे वंशज त्यांच्या हद्दीतून तुम्हांला जायचे आहे; त्यांना तुमची भीती वाटेल म्हणून फार सांभाळा.


अंमलदारांनी सैनिकांना आणखी म्हणावे की, ‘भित्रा व भ्याड मनाचा कोण आहे? त्याने घरी परत जावे, नाहीतर त्याच्या सोबत्याच्या हृदयांचेही त्याच्यासारखेच पाणीपाणी होईल.’


माझ्याबरोबर आलेल्या माझ्या बांधवांनी लोकांच्या काळजाचे पाणीपाणी होईल असे केले, पण मी मात्र आपला देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलो.


हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणीपाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जिवात जीव राहिला नाही; कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे.


ते यहोशवाला म्हणाले, “हा सर्व देश परमेश्वराने आपल्या हाती नक्कीच दिला आहे; शिवाय, आपल्या भीतीमुळे ह्या देशाच्या सर्व रहिवाशांची गाळण उडाली आहे.”


आणि त्यांना म्हणाली, “परमेश्वराने हा देश तुम्हांला दिला आहे. आम्हांला तुमची दहशत बसली आहे, आणि देशातील सर्व रहिवाशांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे, हे मला ठाऊक आहे;


इस्राएल लोक यार्देनेपलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटवले हे यार्देनेपलीकडील अमोर्‍यांच्या सर्व राजांनी व समुद्र-किनार्‍याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणीपाणी झाले आणि त्यांच्यात काही हिंमत राहिली नाही.


इकडे बन्यामिनाच्या गिब्यातल्या शौलाच्या पहारेकर्‍यांनी पाहिले तेव्हा लोकसमुदाय पांगला व लोक सैरावैरा धावू लागले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan