Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 14:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 परमेश्वराने मिसराचा राजा फारो ह्याचे मन कठीण केले आणि तो इस्राएल लोकांच्या पाठीस लागला; इस्राएल लोक तर मोठ्या धैर्याने चालले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 इस्राएल लोक तर मिसरहून मोठ्या अवसानाने चालले होते, परंतु परमेश्वराने फारो राजाचे मन कठीण केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 याहवेहने इजिप्तचा राजा फारोह याचे हृदय कठीण केले म्हणून इस्राएली लोक जे मोठ्या धैर्याने इजिप्तमधून जात होते, त्यांचा त्याने पाठलाग केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 14:8
21 Iomraidhean Croise  

त्याने आपल्या लोकांना आनंद करत, आपल्या निवडलेल्या लोकांना जयोत्सव करत बाहेर आणले.


कारण माझ्यावर तुझी दया फार आहे; अधोलोकाच्या तळापासून तू माझा जीव उद्धरला आहेस.


तथापि परमेश्वराने फारोचे मन कठीण केले, आणि तो त्यांना जाऊ देईना.


हे तुझ्या हातावर चिन्ह व तुझ्या डोळ्यांच्या दरम्यान कपाळपट्टी असे असावे; कारण परमेश्वराने आपल्या बलवान हाताने आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले.”


म्हणून वळसा घेऊन त्याने त्यांना रानाच्या वाटेने तांबड्या समुद्राकडे नेले; इस्राएल लोक मिसर देशातून लढाईला सज्ज होऊन बाहेर निघाले.


हे तुझ्या हातावर चिन्ह व तुझ्या डोळ्यांच्या दरम्यान स्मारक असे असावे; परमेश्वराचा नियम तुझ्या तोंडी असावा; कारण परमेश्वराने भुजबलाने तुला मिसर देशातून बाहेर आणले;


आणि पाहा, मी स्वतः मिसर्‍यांची मने कठीण करीन. ते त्यांच्या पाठीस लागतील; आणि फारो, त्याची सर्व सेना, त्याचे रथ व त्याचे स्वार ह्यांच्याकडून मी आपला सन्मान पावेन.


मी फारोचे मन कठीण करीन आणि तो त्यांचा पाठलाग करील; ह्या प्रकारे फारो व त्याची सर्व सेना ह्यांच्या पराभवाकडून मला गौरव मिळेल, आणि मी परमेश्वर आहे हे मिसरी लोक ओळखतील.” मग त्याप्रमाणे त्यांनी केले.


त्याने सहाशे निवडक रथ व मिसरातले सर्व रथ त्यांवरील सरदारांसह बरोबर घेतले.


शत्रू म्हणाला, मी पाठलाग करीन, मी गाठीन, मी लूट वाटून घेईन; त्यामुळे माझा जीव तृप्त होईल; मी तलवार उपसून आपल्या हाताने त्यांचा नाश करीन.


परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मिसरास परत जाशील तेव्हा पाहा, ज्या अद्भुत कृती मी तुझ्या हाती ठेवल्या आहेत त्या सर्व फारोपुढे करून दाखव; तरी मी त्याचे मन कठीण करीन आणि तो माझ्या लोकांना जाऊ देणार नाही.


मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी आता फारोला काय करतो ते तू पाहशील. मी त्याला भुजप्रताप दाखवला म्हणजे तो ह्या लोकांना जाऊ देईल; मी त्याला भुजप्रताप दाखवला म्हणजे तो ह्यांना आपल्या देशातून बाहेर घालवून देईल.” मोशेला दुसर्‍यांदा झालेले पाचारण


तथापि परमेश्वराने फारोचे मन कठीण केले, आणि परमेश्वराने मोशेला म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे म्हणणे ऐकेना.


हृदयाची कठोरता हा आपला शाप तू त्यांना देशील.


मी परमेश्वर तुमचा देव आहे; तुम्ही मिसर्‍यांचे दास राहू नये म्हणूनच मी तुम्हांला मिसर देशातून काढून बाहेर आणले; मी तुमची जोखडे मोडून तुम्हांला ताठ मानेने चालवले आहे.


पहिल्या महिन्यात म्हणजे पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्यांनी रामसेस येथून कूच केले; वल्हांडणाच्या दुसर्‍या दिवशी इस्राएल लोक सर्व मिसरी लोकांच्या देखत जयघोष करत बाहेर पडले;


ह्या इस्राएल लोकांच्या देवाने आमच्या पूर्वजांना निवडून घेतले, ते लोक मिसर देशात उपरे असताना त्यांचा उत्कर्ष केला आणि पराक्रमी भुजाने त्यांना तेथून काढले.


तेव्हा परमेश्वराने पराक्रमी बाहूने व उगारलेल्या हाताने महाभयंकर उत्पात, चिन्हे व चमत्कार ह्यांच्या योगे आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले;


पण शत्रूच्या खिजवण्याला मी भ्यालो; त्यांच्या विरोधकांनी ह्याचा भलताच अर्थ लावला असता; ते म्हणाले असते की, ‘आमच्याच हाताने पराक्रम केला आहे. ही काही परमेश्वराची कृती नव्हे.’


कारण परमेश्वराचा असा हेतू होता की, आपण मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांचा समूळ नाश करावा, आणि त्यांना काहीच दयामाया न दाखवता त्यांचा संहार करावा. त्यांनी इस्राएलाशी युद्ध करायला बाहेर पडावे म्हणून त्याने त्यांची मने कठीण केली.


तो म्हणतो, याबीनाचा सेनापती सीसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे कीशोन नदीपर्यंत येईल असे मी करीन, आणि त्याला तुझ्या हाती देईन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan