Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 14:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 त्याने त्यांच्या रथांची चाके काढून ते चालवणे कठीण केले; तेव्हा मिसरी लोक म्हणू लागले, “आपण इस्राएलांपासून पळून जाऊ, कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने मिसर्‍यांशी लढत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 रथाची चाके रुतल्यामुळे रथावर ताबा ठेवणे मिसराच्या लोकांस कठीण झाले; तेव्हा ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “आपण येथून लवकर निघून जाऊ या! कारण परमेश्वर इस्राएलाच्या बाजूने आम्हाविरूद्ध लढत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 त्यांच्या रथांची चाके गच्च केली की त्यांना पुढे जाणे कठीण होऊ लागले. तेव्हा इजिप्तची लोक म्हणू लागले, “इस्राएलच्या लोकांपासून आपण दूर जाऊ या! कारण याहवेह त्यांच्यावतीने इजिप्तविरुद्ध लढत आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 14:25
26 Iomraidhean Croise  

परमेश्वर इस्राएलाच्या शत्रूंशी लढला हे जेव्हा देशोदेशीच्या सर्व राज्यांतील लोकांनी ऐकले तेव्हा देवाचा धाक त्यांना बसला.


ही सर्व व्यवस्था पाहून मी उठलो आणि सरदार, शास्ते व वरकड लोक ह्यांना म्हणालो, “त्यांची भीती धरू नका; थोर व भयावह जो परमेश्वर त्याचे स्मरण करून तुमचे भाऊबंद, तुमचे कन्यापुत्र, तुमच्या स्त्रिया व तुमची घरे ह्यांच्यासाठी युद्ध करा.”


आमच्या सर्व शत्रूंनी हे ऐकले तेव्हा आमच्या सभोवताली राहणार्‍या विदेशी लोकांना भीती व लाज वाटली, कारण हे काम आमच्या देवाकडून घडले असे त्यांना दिसून आले.


तू त्यांच्यासमोरून समुद्र दुभंग केला, असा की ते समुद्रामधून कोरड्या जमिनीवरून चालून गेले; धोंडा महाजलाशयात टाकावा त्याप्रमाणे तू त्यांचा पाठलाग करणार्‍यांना समुद्रतळी फेकले.


दुष्टांचे डोळे थकतील; त्यांना कोणतेही शरणस्थान राहणार नाही; प्राण सोडणे एवढीच काय ती त्यांना आशा वाटेल.”


लोखंडी शस्त्रापासून तो निभावला तरी पितळी तीर त्याला विंधून टाकील.


कारण देव त्याच्यावर मारा करील. त्याची गय करणार नाही; तो त्याच्या हातून निसटून जाण्यास पाहील.


हे परमेश्वरा, मला विरोध करणार्‍यांना विरोध कर; माझ्याबरोबर लढणार्‍यांशी लढ.


तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो; तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो; रथ अग्नीत जाळून टाकतो.


“सैन्यांचे राजे पळ काढतात, पळ काढतात;” आणि घरी राहिलेली गृहिणी लूट वाटून देते.


हे याकोबाच्या देवा, तुझ्या धमकीने रथ व घोडा ह्यांना गाढ निद्रा लागली आहे.


परमेश्वर तुमच्यासाठी लढेल; तुम्ही शांत राहा.”


फारो, त्याचे रथ व त्याचे स्वार ह्यांच्या (पराभवा) कडून माझे गौरव झाल्याने मी परमेश्वर आहे हे मिसरी लोक ओळखतील.”


मी फारोचे मन कठीण करीन आणि तो त्यांचा पाठलाग करील; ह्या प्रकारे फारो व त्याची सर्व सेना ह्यांच्या पराभवाकडून मला गौरव मिळेल, आणि मी परमेश्वर आहे हे मिसरी लोक ओळखतील.” मग त्याप्रमाणे त्यांनी केले.


परमेश्वर रणवीर आहे; याव्हे हे त्याचे नाव.


परमेश्वर मला म्हणाला, “जसा सिंह, तरुण सिंह, आपल्या भक्ष्यावर गुरगुरत असता, मेंढरांची टोळी बोलावून त्याच्यावर घातली तरी त्यांच्या आरोळीने घाबरायचा नाही व त्यांच्या गोंगाटाने दबायचा नाही, तसा सेनाधीश परमेश्वर सीयोन डोंगरावर त्याच्या टेकडीवर लढायला उतरेल.”


तुझ्या द्वारे मी घोडा व स्वार ह्यांचे तुकडे तुकडे करीन;


तर मी राब्बाच्या कोटात अग्नी पेटवीन, वधाच्या दिवशी रणशब्द होत असता व वावटळीच्या दिवशी तुफान होत असता तो तिचे महाल जाळून भस्म करील.


एखादा मनुष्य सिंहापासून पळतो तर त्याला अस्वल गाठते, तो घरात येऊन भिंतीला हात टेकतो तर त्याला सर्प दंश करतो, तसा हा प्रकार आहे.


मी प्रभूला वेदीजवळ उभे राहिलेले पाहिले; तो म्हणाला, “खांबांच्या माथ्यांवर प्रहार कर म्हणजे उंबरठे हलतील; त्यांचे तुकडे करून त्या सर्वांच्या डोक्यावर पाड; त्यांच्यातले शेष उरतील ते मी तलवारीने वधीन; त्यांतला कोणी पळून जाऊ पाहील, पण त्याला पळून जाता येणार नाही; त्यांतला कोणी निसटून जाऊ पाहील, पण तो निभावणार नाही.


तुमचा देव परमेश्वर तुमचा अग्रगामी आहे, त्याने मिसर देशात तुमच्यादेखत जे जे केले, ते ते सर्व करून तो तुमच्यासाठी लढेल;


त्यांना भिऊ नका, कारण तुमच्या बाजूने युद्ध करणारा तुमचा देव परमेश्वर आहे.’


त्यांचा दुर्ग आपल्या दुर्गासारखा नाही, हे आपले शत्रूही जाणून आहेत.


असा दिवस त्यापूर्वी किंवा त्यानंतरही आला नाही; त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्राएलासाठी लढत होता.


परमेश्वराने सीसरा, त्याचे सर्व रथ व सर्व सेना ह्यांचा बाराकासमोर तलवारीने धुव्वा उडवला; तेव्हा सीसरा रथावरून उतरून पायीच पळून गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan