Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 14:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 आणि रात्रीच्या शेवटच्या प्रहरी परमेश्वराने अग्नीच्या व मेघाच्या स्तंभातून मिसरी सेनेकडे पाहून त्यांची त्रेधा उडवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 तेव्हा त्या दिवशी भल्या पहाटे परमेश्वराने मेघस्तंभातून व अग्निस्तंभातून खाली मिसराच्या सैन्याकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडवून त्यांचा पराभव केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 पण पहाटेच्या वेळी अग्निस्तंभामधून व मेघस्तंभामधून याहवेहने इजिप्तच्या सेनेकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडविला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 14:24
16 Iomraidhean Croise  

त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्यापुढे चालत असे.


त्याने त्यांच्या रथांची चाके काढून ते चालवणे कठीण केले; तेव्हा मिसरी लोक म्हणू लागले, “आपण इस्राएलांपासून पळून जाऊ, कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने मिसर्‍यांशी लढत आहे.”


हे नगर पाहताच ते विस्मित झाले, व घाबरे होऊन पळत सुटले.


प्रत्येक गर्विष्ठाला पाहून त्याला खाली पाड आणि दुष्टाला जागच्या जागी तुडव.


त्याने कोणाला शांतिसमाधान दिले तर त्याला कोण दोष देईल? त्याने तोंड फिरवले तर त्याचे दर्शन कोणाला होईल? हे राष्ट्रासंबंधाने असो की एका व्यक्तीसंबंधाने असो, सारखेच;


लोक क्षणात मृत्यू पावतात, ऐन मध्यरात्री झटका खाऊन गत होतात; बलिष्ठ जन कोणाचा हात न लागता उच्छेद पावतात.


तो पृथ्वीकडे पाहतो तेव्हा ती कापते; तो पर्वतांना स्पर्श करतो तेव्हा ते धुमसतात.


तू म्हणतोस, ‘देवाला काय कळते? दाट अंधाराच्या आडून तो कशी न्यायाधीशी चालवील?’


दुसर्‍या दिवशी शौलाने आपल्या लोकांच्या तीन तुकड्या केल्या आणि रात्रीच्या शेवटल्या प्रहरी (पहाटे) त्यांनी छावणीत येऊन ऊन होईपर्यंत अम्मोन्यांची कत्तल केली; आणि जे बाकी राहिले त्यांची एवढी दाणादाण केली की त्यांच्यातले दोनसुद्धा एकत्र राहिले नाहीत.


दिवसा मेघ व रात्रभर अग्निप्रकाश ह्यांच्या योगे तो त्यांना नेत असे.


कारण तुझ्या दृष्टीने सहस्र वर्षें कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत.


आणि ते शत्रूंपुढे पाडाव होऊन गेले असले, तरी तेथे मी तलवारीला आज्ञा करीन म्हणजे ती त्यांना वधील; मी त्यांच्याकडे दृष्टी लावीन, ती त्यांच्या वाइटासाठी असेल, बर्‍यासाठी नव्हे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan