Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 14:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 परमेश्वर तुमच्यासाठी लढेल; तुम्ही शांत राहा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 परमेश्वर तुमच्याकरता त्यांच्याशी लढेल, तुम्ही शांत उभे राहा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 याहवेह तुमच्यासाठी लढतील; तुम्ही केवळ स्तब्ध राहा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 14:14
25 Iomraidhean Croise  

आणि तो म्हणाला, “अहो सर्व यहूद्यांनो, यरुशलेमनिवासी जनहो, आणि हे राजा यहोशाफाटा, तुम्ही सगळे ऐका; परमेश्वर तुम्हांला सांगत आहे की, ‘हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका; कचरू नका; कारण युद्ध तुमचे नव्हे, देवाचे आहे.


ह्या लढाईत तुम्हांला लढावे लागणार नाही; हे यहूदा, हे यरुशलेमे, तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करील ते पाहा.’ घाबरू नका, कचरू नका; उद्या त्यांच्यावर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्याबरोबर आहे.”


परमेश्वर इस्राएलाच्या शत्रूंशी लढला हे जेव्हा देशोदेशीच्या सर्व राज्यांतील लोकांनी ऐकले तेव्हा देवाचा धाक त्यांना बसला.


ही सर्व व्यवस्था पाहून मी उठलो आणि सरदार, शास्ते व वरकड लोक ह्यांना म्हणालो, “त्यांची भीती धरू नका; थोर व भयावह जो परमेश्वर त्याचे स्मरण करून तुमचे भाऊबंद, तुमचे कन्यापुत्र, तुमच्या स्त्रिया व तुमची घरे ह्यांच्यासाठी युद्ध करा.”


तर रणशिंगाचा शब्द जेथे ऐकू येईल तेथे तुम्ही आमच्याकडे एकत्र व्हा; आपला देव आपल्यातर्फे लढेल.”


तू त्यांच्यासमोरून समुद्र दुभंग केला, असा की ते समुद्रामधून कोरड्या जमिनीवरून चालून गेले; धोंडा महाजलाशयात टाकावा त्याप्रमाणे तू त्यांचा पाठलाग करणार्‍यांना समुद्रतळी फेकले.


हे परमेश्वरा, मला विरोध करणार्‍यांना विरोध कर; माझ्याबरोबर लढणार्‍यांशी लढ.


आमचा देव येत आहे, तो उगा राहायचा नाही; त्याच्यापुढे अग्नी ग्रासत चालला आहे. त्याच्याभोवती मोठे वादळ सुटले आहे.


हे देवा, तू स्तब्ध राहू नकोस. हे देवा, मौन धरू नकोस, स्वस्थ राहू नकोस.


मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझा धावा करीत काय बसलास? इस्राएल लोकांना सांग की, पुढे चला.


त्याने त्यांच्या रथांची चाके काढून ते चालवणे कठीण केले; तेव्हा मिसरी लोक म्हणू लागले, “आपण इस्राएलांपासून पळून जाऊ, कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने मिसर्‍यांशी लढत आहे.”


परमेश्वर रणवीर आहे; याव्हे हे त्याचे नाव.


कारण प्रभू परमेश्वर, इस्राएलाचा पवित्र प्रभू म्हणाला, “मागे फिरणे व स्वस्थ राहणे ह्यांत तुमचा बचाव आहे; शांतता व श्रद्धा ह्यांत तुमचे सामर्थ्य आहे.” तरी तसे तुम्ही करीत नाही.


परमेश्वरापासून येणार्‍या तारणाची वाट पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे बरे आहे.


तुमचा देव परमेश्वर तुमचा अग्रगामी आहे, त्याने मिसर देशात तुमच्यादेखत जे जे केले, ते ते सर्व करून तो तुमच्यासाठी लढेल;


कारण तुमच्यासाठी तुमच्या शत्रूंशी युद्ध करायला व तुमचा बचाव करायला तुमच्याबरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे.’


त्यांना भिऊ नका, कारण तुमच्या बाजूने युद्ध करणारा तुमचा देव परमेश्वर आहे.’


परमेश्वराने इस्राएलापुढे त्यांची गाळण उडवली. त्यांनी गिबोनात त्यांची मोठी कत्तल करून बेथ-होरोनाच्या चढावाच्या वाटेने त्यांचा पाठलाग केला आणि अजेका व मक्केदा येथपर्यंत ते त्यांना मारत गेले.


असा दिवस त्यापूर्वी किंवा त्यानंतरही आला नाही; त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्राएलासाठी लढत होता.


हे सर्व राजे व त्यांचे देश यहोशवाने एकाच वेळेस घेतले, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर इस्राएलातर्फे लढला.


तुमच्यातला एक जण हजारांना पळवून लावील, कारण तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला सांगितल्याप्रमाणे तो स्वतः तुमच्यासाठी लढणारा आहे.


तुमच्यासाठी तुमचा देव परमेश्वर ह्याने ह्या सर्व राष्ट्रांचे काय केले हे तुम्ही पाहिले आहे, कारण तुमचा देव परमेश्वर स्वत: तुमच्यासाठी लढला.


आकाशातून तारे लढले; त्यांनी आपापल्या कक्षेतून सीसराशी लढाई केली.


तेव्हा पलिष्टी भयभीत होऊन म्हणाले, “देव छावणीत आला आहे; हायहाय, आता आमचे काय होईल! अशी गोष्ट पूर्वी कधी झाली नव्हती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan