Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 14:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका. स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पाहा, कारण ज्या मिसरी लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 परंतु मोशेने उत्तर दिले, “भिऊ नका! स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे तारण करील ते पाहा. आजच्या दिवसानंतर हे मिसराचे लोक तुम्हास पुन्हा कधीही दिसणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 मोशे लोकांना म्हणाला, “घाबरू नका. स्तब्ध राहा व आज याहवेह तुम्हाला अद्भुतरित्या कसे सोडविणार आहे ते पाहा. हे इजिप्तचे लोक जे तुम्हाला आज दिसतात ते पुन्हा दिसणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 14:13
36 Iomraidhean Croise  

ह्या गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टान्तात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे : “अब्रामा, भिऊ नको. मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल.”


त्याच रात्री परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, “तुझा बाप अब्राहाम ह्याचा मी देव आहे; भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी आपला सेवक अब्राहाम ह्याच्यासाठी तुला आशीर्वादित करीन व तुझी संतती बहुगुणित करीन.”


तो म्हणाला, “मी देव, तुझ्या पित्याचा देव आहे; तू मिसरात जायला भिऊ नकोस; तेथे तुझे मी एक मोठे राष्ट्र करीन.


हे परमेश्वरा, मी तुझ्याकडून उद्धार होण्याची प्रतीक्षा करत आहे.


तो म्हणाला, “भिऊ नकोस; त्यांच्या पक्षाचे आहेत त्यांच्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत.”


त्यांनी त्या शेतामध्ये उभे राहून त्याचे रक्षण करून पलिष्ट्यांचा संहार केला; त्या प्रसंगी परमेश्वराने त्यांना मोठा विजय प्राप्त करून देऊन त्यांचा बचाव केला.


आणि तो म्हणाला, “अहो सर्व यहूद्यांनो, यरुशलेमनिवासी जनहो, आणि हे राजा यहोशाफाटा, तुम्ही सगळे ऐका; परमेश्वर तुम्हांला सांगत आहे की, ‘हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका; कचरू नका; कारण युद्ध तुमचे नव्हे, देवाचे आहे.


ह्या लढाईत तुम्हांला लढावे लागणार नाही; हे यहूदा, हे यरुशलेमे, तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करील ते पाहा.’ घाबरू नका, कचरू नका; उद्या त्यांच्यावर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्याबरोबर आहे.”


नंतर तू मिसर देशात आमच्या पूर्वजांचे कष्ट पाहिले व तांबड्या समुद्राच्या तीरी त्यांचा धावा ऐकला;


तारण परमेश्वराच्या हातून होते; तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभो. (सेला)


देव निश्‍चये आपल्या वैर्‍यांचे मस्तक फोडील, जो आपल्या दुष्टाईत निमग्न होऊन चालतो त्याचे केसाळ माथे फोडील.


त्याने त्यांना सुखरूप नेले, ते भ्याले नाहीत, त्यांच्या शत्रूंना तर समुद्राने बुडवून टाकले.


मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल, आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल.


अशा प्रकारे परमेश्वराने त्या दिवशी मिसर्‍यांच्या हातातून इस्राएल लोकांना तारले आणि मिसरी लोक समुद्रतीरी मरून पडलेले इस्राएलांनी पाहिले.


तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका. कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्या मनात राहून तुम्ही पाप करू नये ह्यासाठी देव आला आहे.


ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो.


कारण प्रभू परमेश्वर, इस्राएलाचा पवित्र प्रभू म्हणाला, “मागे फिरणे व स्वस्थ राहणे ह्यांत तुमचा बचाव आहे; शांतता व श्रद्धा ह्यांत तुमचे सामर्थ्य आहे.” तरी तसे तुम्ही करीत नाही.


घाबर्‍या मनाच्यांस म्हणा, “धीर धरा, भिऊ नका; पाहा, तुमचा देव सूड घेण्यास, अनुरूप असे प्रतिफल देण्यास येईल;” तो येईल व तुमचा उद्धार करील.


मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय कोणी त्राता नाही.


आणि त्याला सांग की, ‘सावध हो व शांत राहा; भिऊ नकोस; ह्या दोन कोलितांच्या उरलेल्या धुमसणार्‍या शेपटांमुळे म्हणजे क्रोधाने भडकलेले अरामी रसीन व रमाल्याचा पुत्र ह्यांच्यामुळे तुझे मन खचू देऊ नकोस.


टेकड्यांवरील शब्द, डोंगरांवरील गडबड खोटी ठरली आहे; खरोखर आमचा देव परमेश्वर ह्याच्या ठायी इस्राएलाचे तारण आहे.


परमेश्वरापासून येणार्‍या तारणाची वाट पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे बरे आहे.


यहूदाच्या घराण्यावर मी दया करीन; त्यांचा देव परमेश्वर ह्याच्या हातून त्यांचा उद्धार करीन; धनुष्य, तलवार, लढाई, घोडे अथवा स्वार ह्यांच्या द्वारे हा उद्धार करणार नाही.”


मिसर देशापासून मी परमेश्वर तुझा देव आहे, माझ्यावाचून अन्य देव तुला ठाऊक नाही, माझ्यावाचून कोणी त्राता नाही.


हे इस्राएला, जो मी तुझा साहाय्यकर्ता त्या माझ्यावर तू उलटलास, त्यामुळे तुझा नाश झाला.


तू आपल्या लोकांच्या सुटकेसाठी निघाला आहेस. आपल्या अभिषिक्ताच्या सुटकेसाठी निघाला आहेस; तू दुर्जनांचे घर पायापासून मानेपर्यंत उघडे करतोस, त्याच्या शिराचे आपटून तुकडे करतोस. (सेला)


परमेश्वर नद्यांवर रागावला आहे काय? नद्यांवर तुझा राग पेटला आहे काय? तुझा क्रोध समुद्रावर खवळला आहे काय? म्हणूनच तू आपल्या घोड्यांवर स्वार झालास काय?


तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड मात्र करू नका; आणि त्या देशाच्या लोकांची भीती बाळगू नका, कारण ते आमचे भक्ष्य होतील; त्यांचा आधार तुटला आहे, पण आमच्याबरोबर परमेश्वर आहे; त्यांची भीती बाळगू नका.”


देवदूताने त्या स्त्रियांना म्हटले, “तुम्ही भिऊ नका; वधस्तंभावर खिळलेल्या येशूचा शोध तुम्ही करत आहात, हे मला ठाऊक आहे.


त्याने त्यांना म्हणावे, ‘इस्राएल लोकहो, ऐका; युद्ध करण्यास आज तुम्ही आपल्या शत्रूंच्या जवळ आला आहात; तुमचे मन कचरू देऊ नका, भिऊ नका, थरथर कापू नका, आणि त्यांना पाहून घाबरू नका;


शौल म्हणाला, “आज कोणाही मनुष्याचा वध करायचा नाही; कारण आज परमेश्वराने इस्राएलाचा उद्धार केला आहे.”


आता स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमच्यासमक्ष मोठी कृती करणार आहे ती पाहा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan