Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 14:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 फारो नजीक येऊन ठेपला; इस्राएल लोकांनी टेहळणी करून पाहिले तर मिसरी लोक आपल्या पाठोपाठ येत आहेत असे त्यांना दिसले; तेव्हा त्यांना फार भीती वाटली. ते परमेश्वराचा धावा करू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 फारो व मिसरी सैन्य आपणाकडे येताना इस्राएल लोकांनी पाहिले, तेव्हा ते अतिशय घाबरले; आणि मदतीसाठी ते परमेश्वराचा धावा करू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 फारोह जसा जवळ आला, इस्राएली लोकांनी पाहिले की इजिप्तचे सैन्य त्यांच्यावर चालून येत आहे. ते फार घाबरले व मोठ्याने याहवेहकडे आरोळी मारली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 14:10
23 Iomraidhean Croise  

रथांवरील त्या सरदारांनी यहोशाफाटास पाहिले तेव्हा त्यांना वाटले की हाच इस्राएलाचा राजा असावा; म्हणून त्यांनी त्याच्याशी लढण्यासाठी मोर्चा फिरवला; पण यहोशाफाटाने आरोळी ठोकली तेव्हा परमेश्वराने त्याला साहाय्य केले. देवाने त्यांना त्याच्याकडून निघून जाण्यास प्रवृत्त केले.


नंतर तू मिसर देशात आमच्या पूर्वजांचे कष्ट पाहिले व तांबड्या समुद्राच्या तीरी त्यांचा धावा ऐकला;


तथापि त्यांची आरोळी ऐकून परमेश्वराने त्यांच्या संकटाकडे दृष्टी लावली;


तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला, आणि त्याने त्यांना क्लेशातून मुक्त केले.


ते संकटसमयी परमेश्वराचा धावा करतात, आणि तो त्यांना क्लेशांतून मुक्त करतो.


ते संकटसमयी परमेश्वराचा धावा करतात, आणि तो त्यांना क्लेशातून मुक्त करतो.


तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला, आणि त्याने त्यांना क्लेशातून मुक्त केले.


नीतिमान धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटांतून मुक्त करतो.


पूर्वी कधीही भ्याले नव्हते इतके ते भेदरले आहेत; कारण तुझ्याविरुद्ध छावणी देऊन बसणार्‍यांची हाडे देवाने विखरली आहेत; तू त्यांची फजिती केली आहेस, कारण देवाने त्यांचा धिक्कार केला आहे.


तू संकटात असता आरोळी केली तेव्हा मी तुला सोडवले; मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थलातून उत्तर दिले; मरीबाच्या जलांजवळ मी तुला पारखले. (सेला)


फारोने लोकांना जाऊ दिले तेव्हा पलिष्टी लोकांच्या देशाची वाट जवळची असूनही देवाने त्यांना त्या वाटेने जाऊ दिले नाही, कारण लढाई दिसताच लोक माघार घेऊन मिसराकडे परत जातील असे देवाला वाटले.


त्याने परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने त्याला एक झाड दाखवले, ते त्याने पाण्यात टाकल्यावर पाणी गोड झाले. तेथे परमेश्वराने2 त्यांच्यासाठी विधी व नियम लावून दिला; त्यांना कसोटीस लावले आणि म्हटले,


हे परमेश्वरा, संकटाच्या वेळी त्यांनी तुझ्याकडे दृष्टी फिरवली; त्यांना तुझ्याकडून शिक्षा झाली तेव्हा त्यांनी मंद स्वराने आपले हृद्‍गत तुला कळवले.


‘अरामाची एफ्राइमाशी जूट झाली आहे’ असे दाविदाच्या घराण्याला कळवण्यात आले तेव्हा रानातील वृक्ष वार्‍याने कापतात तसे त्याचे मन व त्याच्या लोकांची मने कंपित झाली.


अगे लबानोनवासिनी, गंधसरूंवर घरटे करणारे, तुला तिडका येतील; प्रसूत होणार्‍या स्त्रीप्रमाणे तू वेणा देशील तेव्हा तू कशी धापा टाकशील!”


रानात तू आपला देव परमेश्वर ह्याला संतापवलेस त्याची आठवण ठेव, विसरू नकोस; मिसर देशातून तुम्ही बाहेर निघालात तेव्हापासून ह्या ठिकाणी येऊन पोहचेपर्यंत तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंडच करीत आला आहात.


मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून काढून आणले; मग तुम्ही समुद्रापर्यंत येऊन पोहचला आणि मिसरी लोकांनी रथ व स्वार ह्यांसह तांबड्या समुद्रापर्यंत तुमच्या पूर्वजांचा पाठलाग केला.


त्यांनी परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने तुमच्या व मिसर्‍यांच्या मध्ये अंधार पाडला आणि त्यांच्यावर समुद्र आणून त्यांना गडप केले; मिसर देशात मी जे काही केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले. नंतर तुम्ही पुष्कळ दिवस रानात राहिलात.


प्रीतीच्या ठायी भीती नसते; इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते; भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan