Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 13:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्यापुढे चालत असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मेघस्तंभाच्या ठायी आणि रात्री त्यांना प्रकाश देण्यासाठी अग्नीस्तंभाच्या ठायी त्यांच्यापुढे चालत असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 दिवस व रात्र ते प्रवास करू शकतील, म्हणून दिवसा मेघस्तंभातून त्यांचे मार्गदर्शन करीत व रात्री अग्निस्तंभातून प्रकाश देत याहवेह त्यांच्या पुढे चालले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 13:21
21 Iomraidhean Croise  

तू त्यांना दिवसा मेघस्तंभाने आणि रात्री ज्या वाटेने त्यांनी जायचे तिच्यावर प्रकाश मिळावा म्हणून अग्निस्तंभाने त्यांना नेले.


तथापि तू अति दयाळू असल्याकारणाने त्यांना तू रानात सोडून दिले नाहीस; दिवसा त्यांचा मार्गदर्शक मेघस्तंभ त्यांच्यावरून ढळला नाही आणि रात्रीचा प्रकाश देऊन नीट मार्ग दाखवणारा अग्निस्तंभही ढळला नाही.


त्यांच्यावर छत्र होण्यासाठी त्याने ढग पसरला, आणि रात्री प्रकाश देण्यासाठी अग्निस्तंभ दिला.


हे देवा, जेव्हा तू आपल्या लोकांपुढे चाललास व रानातून प्रयाण केलेस, (सेला)


मोशे व अहरोन ह्यांच्या हस्ते तू आपले लोक कळपांप्रमाणे नेले.


दिवसा मेघ व रात्रभर अग्निप्रकाश ह्यांच्या योगे तो त्यांना नेत असे.


मेघस्तंभांतून तो त्यांच्याशी बोलला; त्याचे निर्बंध व त्याने लावून दिलेले नियम त्यांनी पाळले.


तो त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला तुमच्या मुलाबाळांसह जाऊ दिले तर परमेश्वर तुमच्याबरोबर असो! खबरदार, तुमच्या मनात वाईट हेतू आहे.


अहरोन इस्राएलांच्या सर्व मंडळीशी बोलत असता त्यांनी रानाकडे नजर फिरवली, तेव्हा ढगात परमेश्वराचे तेज त्यांना दिसले.


मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले तेव्हा ते अहरोनाभोवती जमून त्याला म्हणाले, “ऊठ, आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव; कारण आम्हांला मिसर देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोशे ह्याचे काय झाले हे आम्हांला कळत नाही.”


गंधरस व ऊद, सौदागराकडील एकंदर सुवासिक द्रव्ये ह्यांच्या सुगंधाने युक्त असे धुरांच्या स्तंभांसारखे रानातून हे येत आहे ते काय?


ते तळ हलवून मार्गस्थ होत तेव्हा परमेश्वराचा मेघ दिवसा त्यांच्यावर असे.


आता जर तू त्यांचा संहार केलास तर मिसरी लोक ते ऐकतील आणि ह्या देशातील रहिवाशांनाही ते सांगतील. ह्यांनी ऐकले आहे की, तू परमेश्वर ह्या लोकांमध्ये वस्ती करतोस आणि तू परमेश्वर त्यांना प्रत्यक्ष दर्शन देतोस; तुझा मेघ त्यांच्यावर असतो आणि तू दिवसा मेघस्तंभातून व रात्री अग्निस्तंभातून त्यांच्यापुढे चालत असतोस.


तुमच्यासाठी वाटेत तळ देण्याचे ठिकाण शोधण्यास आणि रात्री अग्नीत व दिवसा मेघात प्रकट होऊन, ज्या वाटेने तुम्ही जायचे ती वाट तुम्हांला दाखवण्यास तो तुमच्यापुढे चालला.


तुझ्यापुढे चालणारा परमेश्वरच आहे; तो तुझ्याबरोबर असेल; तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही; भिऊ नकोस व कचरू नकोस.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan