Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 13:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 म्हणून वळसा घेऊन त्याने त्यांना रानाच्या वाटेने तांबड्या समुद्राकडे नेले; इस्राएल लोक मिसर देशातून लढाईला सज्ज होऊन बाहेर निघाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 म्हणून देवाने त्यांना दुसऱ्या मार्गाने तांबड्या समुद्राजवळील रानातून नेले. इस्राएल लोक मिसरामधून सशस्त्र बाहेर निघाले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 म्हणून परमेश्वराने त्यांना तांबड्या समुद्राकडून रानाच्या मार्गाने नेले. इस्राएली लोक लढाईसाठी सज्ज होऊन इजिप्तमधून बाहेर पडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 13:18
13 Iomraidhean Croise  

मग योसेफाने इस्राएल वंशजांना शपथ घालून म्हटले, “देव खरोखर तुमची भेट घेईल तेव्हा तुम्ही माझ्या अस्थी येथून घेऊन जा.”


वस्तीच्या नगरास त्यांनी जावे म्हणून त्याने त्यांना सरळ मार्गाने चालवले.


ज्याने आपल्या लोकांना रानातून नेले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.


तेव्हा भूमी कंपित झाली, व देवासमोर आकाशातून पर्जन्यवृष्टी झाली; देवासमोर, इस्राएलाच्या देवासमोर, सीनाय पर्वतदेखील कंपित झाला.


त्याच दिवशी परमेश्वराने इस्राएल लोकांना टोळीटोळीने मिसर देशातून बाहेर आणले.


“इस्राएल लोकांना असे सांग की, तुम्ही मागे फिरून मिग्दोल आणि समुद्र ह्यांच्यामध्ये असलेल्या पी-हहिरोथापुढे बाल-सफोनासमोर तळ द्यावा; त्यासमोर समुद्राजवळ आपले डेरे उभारावेत.


मग फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार ह्यांसह मिसरी सैन्याने त्यांचा पाठलाग करून पी-हहिरोथानजीक व बाल-सफोना-समोर समुद्रतीरी त्यांनी तळ दिला होता तेथे त्यांना गाठले.


मात्र त्याने फार घोडे बाळगू नयेत; घोडदळ वाढवण्यासाठी लोकांना मिसर देशाकडे पुन्हा धाव घ्यायला लावू नये, कारण त्या मार्गाने जाऊ नये असे परमेश्वराने तुम्हांला सांगितलेच आहे.


तो त्याला वैराण प्रदेशात व घोंघावणार्‍या ओसाड रानात सापडला; त्याने त्याच्या सभोवती राहून त्याची निगा राखली, आपल्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे त्याला सांभाळले.


ह्या यार्देनेच्या पूर्वेकडील जो देश मोशेने तुम्हांला दिला आहे त्यातच तुमच्या स्त्रिया, मुलेबाळे आणि गुरेढोरे ह्यांनी राहावे; पण तुम्ही सर्व योद्ध्यांनी सशस्त्र होऊन आपल्या बांधवांपुढे नदीपलीकडे कूच करावे आणि त्यांना कुमक द्यावी.


रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश हे मोशेच्या सांगण्याप्रमाणे सशस्त्र होऊन इस्राएल लोकांपुढे पलीकडे गेले;


युद्धासाठी सज्ज झालेले सुमारे चाळीस हजार पुरुष परमेश्वरासमोर नदी उतरून यरीहोजवळच्या मैदानात पोहचले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan