Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 13:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 फारोने लोकांना जाऊ दिले तेव्हा पलिष्टी लोकांच्या देशाची वाट जवळची असूनही देवाने त्यांना त्या वाटेने जाऊ दिले नाही, कारण लढाई दिसताच लोक माघार घेऊन मिसराकडे परत जातील असे देवाला वाटले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 फारोने लोकांस जाऊ दिले, परंतु परमेश्वराने लोकांस पलिष्टी लोकांच्या देशातून जवळची वाट असताना देखील त्यातून जाऊ दिले नाही “युध्द प्रसंग पाहून हे लोक माघार घेऊन मिसर देशाला परत जातील, असे देवाला वाटले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 शेवटी फारोहने जेव्हा लोकांस जाऊ दिले, तेव्हा परमेश्वराने त्यांना पलिष्ट्यांच्या देशातून जवळचा मार्ग असूनही तिथून चालविले नाही. कारण परमेश्वर म्हणाले, “जर युद्धाला सामोरे जावे लागले तर त्यांचे मन बदलेल व ते पुन्हा इजिप्तकडे जातील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 13:17
14 Iomraidhean Croise  

तर ज्या देशात त्यांना पाडाव करून नेले तेथे ते विचार करतील आणि आपल्याला पाडाव करून नेणार्‍या लोकांच्या देशांत तुझ्याकडे वळून तुझी विनवणी करून म्हणतील, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही कुटिलतेने वागलो आहोत, आम्ही दुराचरण केले आहे’;


त्यांनी हुकूम मानण्याचे नाकारले, आणि जी आश्‍चर्यकृत्ये तू त्यांच्यामध्ये केली होतीस त्यांची त्यांनी पर्वा केली नाही; पण त्यांनी आपली मान ताठ करून एवढे बंड केले की आपल्या दास्यात परत जाण्यासाठी त्यांनी एक नायक नेमला; पण तू क्षमाशील, कृपाळू, दयामय, मंदक्रोध व अतिकरुणामय देव आहेस; तू त्यांचा त्याग केला नाहीस.


फारो नजीक येऊन ठेपला; इस्राएल लोकांनी टेहळणी करून पाहिले तर मिसरी लोक आपल्या पाठोपाठ येत आहेत असे त्यांना दिसले; तेव्हा त्यांना फार भीती वाटली. ते परमेश्वराचा धावा करू लागले.


परंतु पौलाला वाटले की, पंफुल्याहून जो आपल्याला सोडून गेला होता व आपल्याबरोबर काम करण्यास आला नाही त्याला सोबतीस घेणे योग्य नाही.


त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती; तर त्यांनी त्याला धिक्कारले व आपले मन ‘मिसर देशाकडे फिरवून


मात्र त्याने फार घोडे बाळगू नयेत; घोडदळ वाढवण्यासाठी लोकांना मिसर देशाकडे पुन्हा धाव घ्यायला लावू नये, कारण त्या मार्गाने जाऊ नये असे परमेश्वराने तुम्हांला सांगितलेच आहे.


अंमलदारांनी सैनिकांना आणखी म्हणावे की, ‘भित्रा व भ्याड मनाचा कोण आहे? त्याने घरी परत जावे, नाहीतर त्याच्या सोबत्याच्या हृदयांचेही त्याच्यासारखेच पाणीपाणी होईल.’


जो मार्ग पुन्हा तुमच्या दृष्टीस कधी पडणार नाही असे मी म्हणालो होतो त्याच मार्गाने परमेश्वर तुम्हांला जहाजांनी मिसर देशात परत नेईल; तेथे तुम्ही आपल्या शत्रूंचे दास व दासी होण्यासाठी स्वत:ची विक्री करू पाहाल, पण कोणी तुम्हांला विकत घेणार नाही.


त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने मिसर देश सोडला; कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.


म्हणून आता लोकांना ऐकू जाईल असे जाहीर कर की, ज्याला भीती वाटत असेल किंवा जो घाबरट असेल त्याने गिलाद डोंगरावरून निघून परत जावे.” तेव्हा त्यांच्यातून बावीस हजार लोक परत गेले आणि दहा हजार राहिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan