Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 12:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 ह्या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा; आणि संध्याकाळी इस्राएल मंडळीतील लोकांनी तो वधावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 या पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा. संध्याकाळी इस्राएली मंडळीतील लोकांनी त्यास वधावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत त्यांची काळजी घ्यावी आणि इस्राएली लोकातील सर्वांनी सायंकाळी ते कापावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 12:6
34 Iomraidhean Croise  

योशीयाने परमेश्वराप्रीत्यर्थ यरुशलेमेत वल्हांडण सण पाळला; पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस वल्हांडणाचा यज्ञपशू मारला.


पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस बंदिवासातून परत आलेल्या लोकांनी वल्हांडण सण पाळला.


हा दिवस तुम्हांला स्मारकादाखल होईल. ह्या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरवून सण पाळावा; पिढ्यानपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा.


ह्या प्रकारे तुम्ही बेखमीर भाकरीचा सण पाळावा, कारण ह्याच दिवशी मी तुमच्या सेना मिसर देशातून बाहेर आणल्या; ह्यास्तव हा दिवस पिढ्यानपिढ्या कायमचा विधी म्हणून पाळावा.


पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळ-पासून ते त्या महिन्याच्या एकविसाव्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही बेखमीर भाकरी खाव्यात.


इस्राएलाच्या सार्‍या मंडळीने हा विधी पाळावा.


मग एलीम येथून कूच करून इस्राएल लोकांचा सर्व समुदाय मिसर देशातून निघाल्यावर दुसर्‍या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एलीम आणि सीनाय ह्यांच्यामधल्या सीन रानात येऊन पोहचला.


“इस्राएल लोकांची कुरकुर मी ऐकली आहे; त्यांना सांग की संध्याकाळी तुम्ही मांस खाल आणि सकाळी पोटभर भाकर खाल, म्हणजे मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल.”


इस्राएल लोकांना मिसर देशातून निघून तीन महिने झाले त्याच दिवशी ते सीनायच्या रानात येऊन पोहचले.


एक कोकरू सकाळी अर्पावे आणि दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे;


दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे व त्याच्याबरोबरही सकाळच्याप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पण करावे; हे परमेश्वराला प्रिय असे सुवासिक हव्य होय.


आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता; अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले.


पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस तुम्ही वल्हांडण, म्हणजे पूर्ण एक सप्तकाचा सण पाळावा; ह्या सणात बेखमीर भाकर खावी.


पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी परमेश्वराचा वल्हांडण सण येतो.


पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस परमेश्वराचा वल्हांडण सण पाळावा.


पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये.


दुसर्‍या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी त्यांनी सण पाळावा; त्यांनी बेखमीर भाकर आणि कडू भाजी ह्यांच्याबरोबर वल्हांडणाचा यज्ञपशू खावा;


इकडे मुख्य याजक व वडील ह्यांनी बरब्बाला मागून घ्यावे व येशूचा नाश करावा, म्हणून लोकसमुदायाचे मन वळवले.


सर्व लोकांनी उत्तर दिले की, “त्याचे रक्त आमच्यावर व आमच्या मुलाबाळांवर असो.”


मग पहाट होताच वडील व शास्त्री ह्यांच्याबरोबर मुख्य याजक व सबंध न्यायसभा ह्यांनी मसलत करून येशूला बांधून नेऊन पिलाताच्या स्वाधीन केले.


परंतु त्याला सोडण्याऐवजी ‘बरब्बाला आमच्यासाठी सोडा’ अशी मागणी करण्यास मुख्य याजकांनी लोकसमुदायास चिथावले.


त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले तेव्हा दिवसाचा तिसरा तास झाला होता.


लोकसमुदाय पुढे येऊन पिलाताला विनवू लागला की, “आपण आपल्या रिवाजाप्रमाणे करावे.”


नंतर ती सर्व मंडळी उठली व त्यांनी त्याला पिलाताकडे नेले.


परंतु सर्वांनी एकच ओरडा करून म्हटले, “ह्याची वाट लावा आणि आमच्यासाठी बरब्बाला सोडा.”


तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले.


जो पवित्र व नीतिमान त्याला तुम्ही नाकारले, आणि ‘खुनी पुरुष आम्हांला द्या’ अशी मागणी केली.


कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र ‘सेवक’ येशू ह्याच्या विरुद्ध ह्या शहरात परराष्ट्रीय व इस्राएल लोक ह्यांच्यासह हेरोद व पंतय पिलात हे एकत्र झाले;


इस्राएल लोकांनी गिलगालात तळ दिल्यावर यरीहोजवळच्या मैदानात त्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी वल्हांडण सण पाळला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan