Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 12:51 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

51 त्याच दिवशी परमेश्वराने इस्राएल लोकांना टोळीटोळीने मिसर देशातून बाहेर आणले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

51 अशा रीतीने त्याच दिवशी परमेश्वराने सर्व इस्राएली लोकांच्या सशस्त्र टोळ्या करून त्यांना टोळीटोळीने मिसर देशातून बाहेर काढून आणले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

51 याच दिवशी याहवेहने वंशानुसार इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 12:51
25 Iomraidhean Croise  

नंतर योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी आता मरणार; देव खरोखर तुमची भेट घेईल. जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना त्याने शपथपूर्वक देऊ केला आहे त्यात तुम्हांला ह्या देशातून घेऊन जाईल.”


इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यापासून चारशे ऐंशीव्या वर्षी, इस्राएलावरील शलमोनाच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, दुसर्‍या म्हणजे जिव नावाच्या महिन्यात शलमोनाने परमेश्वराचे मंदिर बांधण्यास सुरुवात केली.


तेव्हा परमेश्वराने आसा व यहूदी ह्यांच्यापुढे कूशी लोकांना असा मार दिला की ते पळून गेले.


इस्राएल मिसर देशातून निघाला, याकोबाचे घराणे परकी भाषा बोलणार्‍या लोकांतून निघाले,


ज्याने मिसरी लोकांतून इस्राएल लोकांना बाहेर आणले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.


चारशे तीस वर्षे संपली त्याच दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिसर देशातून निघाल्या.


ह्या प्रकारे सर्व इस्राएल लोकांनी केले; परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले.


मग परमेश्वराने मोशेला सांगितले की,


मग एलीम येथून कूच करून इस्राएल लोकांचा सर्व समुदाय मिसर देशातून निघाल्यावर दुसर्‍या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एलीम आणि सीनाय ह्यांच्यामधल्या सीन रानात येऊन पोहचला.


इस्राएल लोकांना मिसर देशातून निघून तीन महिने झाले त्याच दिवशी ते सीनायच्या रानात येऊन पोहचले.


त्यांना मिसरी लोकांच्या हातातून सोडवावे, आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्या देशात त्यांना घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.


इस्राएल लोकांच्या सेना करून त्यांना मिसर देशातून बाहेर घेऊन जा असे परमेश्वराने ज्यांना सांगितले तेच हे अहरोन व मोशे.


म्हणून इस्राएल लोकांना सांग, ‘मी परमेश्वर आहे; मी तुम्हांला मिसरी लोकांच्या बिगारीच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हांला मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन;


तरी फारो तुमचे काही ऐकणार नाही. मग मी मिसरावर आपला हात टाकीन आणि त्यांना मोठ्या शिक्षा करून मी माझ्या सेना, माझे लोक, इस्राएलवंशज ह्यांना मिसर देशातून बाहेर काढीन.


म्हणजे तुमच्या पुढील पिढ्यांना कळेल की, मी इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर काढले तेव्हा मांडवात त्यांना राहायला लावले; मी परमेश्वर तुमचा देव आहे.” ह्याप्रमाणे मोशेने इस्राएल लोकांना नेमलेले समय कळवले.


मी तुम्हांला अमोरी लोकांच्या देशाचे वतन देण्यास मिसर देशातून आणले व चाळीस वर्षे रानातून फिरवले.


मी तर तुला मिसर देशातून बाहेर आणले, दास्यगृहातून तुला सोडवून घेतले; मी तुझ्यापुढे मोशे, अहरोन व मिर्याम ह्यांना पाठवले.


देवाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले; जणू काय रानबैलांचे बळ त्यांच्या ठायी आहे.


“मिसर देशातून मोशे व इस्राएल लोक आले होते तेव्हा त्यांना परमेश्वराने आज्ञा केली होती त्याप्रमाणेच आताही वीस वर्षांच्या किंवा त्यांहून अधिक वयाच्या पुरुषांची गणती करा.”


मोशे व अहरोन ह्यांच्या नेतृत्वाखाली इस्राएल लोकांच्या ज्या सेना मिसर देशातून बाहेर पडल्या त्यांच्या मजला ह्याप्रमाणे :


ह्या इस्राएल लोकांच्या देवाने आमच्या पूर्वजांना निवडून घेतले, ते लोक मिसर देशात उपरे असताना त्यांचा उत्कर्ष केला आणि पराक्रमी भुजाने त्यांना तेथून काढले.


अबीब महिना पाळून आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडण सण कर, कारण अबीब महिन्यातच तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मिसर देशातून रात्रीच्या वेळी बाहेर आणले.


त्याने तुझ्या पूर्वजांवर प्रीती केली म्हणून त्यांच्यामागून त्यांच्या संतानाला त्याने निवडून घेतले आणि स्वतः आपल्या महासामर्थ्याने त्याने तुला मिसर देशातून बाहेर आणले.


नंतर मी मोशे व अहरोन ह्यांना पाठवून मिसर देशात जी कृत्ये केली त्या कृत्यांनी त्या देशाला पिडले; नंतर मी तुम्हांला बाहेर आणले.


तुम्हांला हे सर्व ठाऊकच आहे, तरी तुम्हांला ह्याची आठवण करून द्यावी अशी माझी इच्छा आहे; ते हे की, प्रभूने मिसर देशातून आपल्या लोकांना निभावून नेले, आणि जे विश्वासहीन झाले त्यांचा नाश केला;


Lean sinn:

Sanasan


Sanasan