Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 12:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 इस्राएलाच्या सर्व मंडळीला सांगा की, ह्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही आपापल्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे एकेका घराण्यामागे एकेक कोकरू घ्यावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 इस्राएलाच्या सर्व मंडळीला सांग की या महिन्याच्या दहाव्या दिवशी प्रत्येक मनुष्याने आपल्या कुटुंबातील लोकांकरता एक कोकरू घ्यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तू इस्राएलाच्या सर्व समुदायाला जाहीर कर की, या महिन्याच्या दहाव्या दिवशी, प्रत्येकाने आपल्या कुटुंबासाठी एक कोकरू घ्यावे, प्रत्येक घराण्यासाठी एक कोकरू.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 12:3
26 Iomraidhean Croise  

अब्राहाम म्हणाला, “बाळा, देव स्वत: होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल.” आणि ते दोघे बरोबर चालले.


हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यांतून म्हणजे त्यांच्यातल्या पुष्ट मेंढरांतून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण ह्यांचा आदर केला;


जे लोक तेथे हजर होते त्या सर्वांना योशीयाने वल्हांडणाच्या यज्ञासाठी राजाच्या मालमत्तेतून तीस हजार शेरडेमेढरे व तीन हजार बैल दिले.


“हा महिना तुम्हांला आरंभीचा महिना व्हावा; तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा.


मग मोशेने इस्राएलाच्या सर्व वडिलांना बोलावून म्हटले, “तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एकेक कोकरू निवडून घ्यावे आणि वल्हांडणाचा यज्ञपशू वधावा.


आणि एक कोकरू खपायचे नाही इतकी थोडकी माणसे कोणाच्या घराण्यात असली तर त्याने व त्याच्या घराजवळच्या शेजार्‍याने आपल्या घराण्यातील संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे; प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती माणसांना पुरेल ह्याचा हिशोब करावा.


ह्या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा; आणि संध्याकाळी इस्राएल मंडळीतील लोकांनी तो वधावा.


मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझा धावा करीत काय बसलास? इस्राएल लोकांना सांग की, पुढे चला.


आणि मोशेला म्हणाले, “आमच्याशी तूच बोल, म्हणजे आम्ही ऐकू; देव आमच्याशी न बोलो, तो बोलला तर आम्ही मरू.”


आणि परमेश्वराने मोशेला जे काही सांगितले होते ते सर्व अहरोनाने लोकांना कळवले आणि त्यांना चिन्हे करून दाखवली.


म्हणून इस्राएल लोकांना सांग, ‘मी परमेश्वर आहे; मी तुम्हांला मिसरी लोकांच्या बिगारीच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हांला मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन;


आमच्या बंदिवासाच्या पंचविसाव्या वर्षी, म्हणजे नगराचा विध्वंस झाल्यावर चौदाव्या वर्षी, वर्षारंभाच्या महिन्याच्या दशमीसच परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला व त्याने मला तेथे नेले.


“इस्राएल लोकांना असे सांग की तुमच्यापैकी कोणी मनुष्य परमेश्वराला पशुबली अर्पील तेव्हा त्याने तो गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांतला अर्पावा.


आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वराप्रीत्यर्थ त्याने दोषार्पण आणावे; त्याने कळपातील कोकरांची किंवा करडांची एक मादी पापार्पण म्हणून आणावी; आणि याजकाने त्याच्या पापाबद्दल त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे.


प्रत्येक गोर्‍ह्यासह, प्रत्येक मेंढ्यासह, प्रत्येक कोकरासह व प्रत्येक करडासह वर सांगितल्याप्रमाणे अर्पण करावे.


दुसर्‍या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!


येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, “हा पाहा, देवाचा कोकरा!”


मग येशू वल्हांडणाच्या पूर्वी सहा दिवस बेथानीस आला. जो लाजर मेला होता व ज्याला त्याने मेलेल्यांतून उठवले होते तो तेथे होता.


दुसर्‍या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरुशलेमेस येत आहे असे ऐकून


तर जुने खमीर काढून टाका, अशा हेतूने की, तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे, कारण आपला वल्हांडणाचा यज्ञपशू जो ख्रिस्त त्याचे आपल्यासाठी अर्पण झाले.


सकाळी तुम्हांला आपापल्या वंशाच्या क्रमाने पुढे आणण्यात येईल; मग ज्या वंशाला परमेश्वर पकडील त्या वंशाच्या एकेका कुळाने पुढे यावे; नंतर ज्या कुळाला परमेश्वर पकडील त्या कुळातील एकेका घराण्याने पुढे यावे; मग ज्या घराण्याला परमेश्वर पकडील त्या घराण्यातील एकेका पुरुषाने पुढे यावे;


‘ज्या कोणाची’ नावे जगाच्या स्थापनेपासून ‘वधलेल्या कोकर्‍याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली’ नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या श्वापदाला नमन करतील.


मग शमुवेलाने एक दूधपिते कोकरू घेऊन व त्याचा परमेश्वराला नि:शेष होम करून इस्राएलासाठी परमेश्वराची आराधना केली व ती परमेश्वराने ऐकली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan