Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 12:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 इस्राएल लोकांनी जाऊन तसे केले; परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना आज्ञा दिली त्याप्रमाणे त्यांनी केले. शेवटली पीडा :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 परमेश्वराने मोशे व अहरोन यांना आज्ञा दिली होती म्हणून इस्राएल लोकांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 मग याहवेहने मोशे व अहरोन यांना आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 12:28
23 Iomraidhean Croise  

परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे दाविदाने केले आणि गेबापासून गेजेरापर्यंत तो पलिष्ट्यांना मार देत गेला.


परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देनेसमोरच्या करीथ ओहळानजीक जाऊन राहिला.


तेव्हा तुम्ही सांगा की, हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे; त्याने मिसरी लोकांना मारले व आमच्या घरांचा बचाव केला त्या समयी तो मिसरातील इस्राएलांची घरे ओलांडून गेला.” हे ऐकून लोकांनी मस्तके लववून दंडवत घातले.


मध्यरात्री असे झाले की मिसर देशातील सिंहासनावर बसणार्‍या फारोच्या ज्येष्ठ मुलापासून तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या ज्येष्ठ मुलापर्यंत सर्व, आणि गुराढोरांपैकी सर्व प्रथमवत्स परमेश्वराने मारून टाकले.


मोशेच्या सांगण्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले; त्यांनी मिसरी लोकांपासून सोन्याचांदीचे दागिने व वस्त्रे-प्रावरणे मागून घेतली;


मी फारोचे मन कठीण करीन आणि तो त्यांचा पाठलाग करील; ह्या प्रकारे फारो व त्याची सर्व सेना ह्यांच्या पराभवाकडून मला गौरव मिळेल, आणि मी परमेश्वर आहे हे मिसरी लोक ओळखतील.” मग त्याप्रमाणे त्यांनी केले.


परमेश्वराच्या सर्व आज्ञांप्रमाणे पवित्रस्थानाच्या सेवेसाठी सर्व तर्‍हेचे काम कसे करावे ते समजण्यासाठी ज्यांच्या ठायी परमेश्वराने बुद्धी व समज घातली आहे ते बसालेल, अहलियाब आणि प्रत्येक ज्ञानी मनुष्य ह्यांनी हे काम करावे. लोक भरपूर दाने आणतात


ह्या प्रकारे दर्शमंडपाच्या निवासमंडपाचे सर्व काम समाप्त झाले; परमेश्वराने आज्ञा दिली होती तिला अनुसरून इस्राएल लोकांनी हे सर्व केले.


परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती, तिला अनुसरून इस्राएल लोकांनी सगळे काम केले.


लोकांनी काम केले ते सर्व मोशेने पाहिले. ते त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले होते, म्हणून त्याने त्यांना आशीर्वाद दिला.


मग मोशे व अहरोन ह्यांनी फारोजवळ जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले; अहरोनाने आपली काठी फारो व त्याचे सेवक ह्यांच्यापुढे टाकली तेव्हा तिचा साप झाला.


मोशे व अहरोन ह्यांनी तसे केले; परमेश्वराने त्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी केले.


मोशेने इस्राएल लोकांना हे सांगितले तेव्हा त्यांनी त्या शिव्याशाप देणार्‍याला छावणीबाहेर नेऊन दगडमार केला. अशा प्रकारे परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले.


इस्राएल लोकांनी ह्याप्रमाणे केले; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी सर्वकाही केले.


परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे मोशे व एलाजार याजक ह्यांनी केले.


परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे परमेश्वराप्रीत्यर्थ हा कर समर्पित म्हणून त्याने एलाजार याजकाला दिला.


मंडळीला मिळालेल्या हिश्शातून मोशेने माणसे व जनावरे ह्यांच्यापैकी प्रत्येक पन्नासांमागे एक घेऊन परमेश्वराच्या निवासमंडपाचे रक्षण करणार्‍या लेव्यांना दिले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.


इस्राएल लोकांनी त्याप्रमाणे केले, म्हणजे असल्या लोकांना छावणीबाहेर पाठवून दिले; परमेश्वराने मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले.


नूनाचा मुलगा यहोशवा ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण झाला होता, कारण मोशेने त्याच्यावर आपले हात ठेवले होते. इस्राएल लोक त्याचे ऐकून परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे वागू लागले.


त्याने ‘वल्हांडण सण’ व ‘रक्तसिंचन’ हे विधी विश्वासाने पाळले, ते अशा हेतूने की, प्रथमजन्मलेल्यांचा ‘नाश करणार्‍याने’ त्यांना शिवू नये.


परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेला अनुसरून इस्राएल लोकांनी तो देश वाटून घेतला. कालेबाला हेब्रोन देण्यात येते


ती म्हणाली, “तुमच्या सांगण्याप्रमाणेच होईल.” ह्याप्रमाणे त्यांना निरोप दिल्यावर ते मार्गस्थ झाले; नंतर तिने किरमिजी दोर आपल्या खिडकीला बांधला.


यहोशवाच्या ह्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी केले; परमेश्वराने यहोशवाला सांगितल्याप्रमाणे त्यांनी इस्राएल लोकांच्या वंशांच्या संख्येप्रमाणे बारा धोंडे यार्देनेच्या मध्यभागातून उचलून आणून आपल्याबरोबर मुक्कामावर ठेवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan