Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 12:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 नंतर एजोब झाडाची एक जुडी घेऊन ती पात्रातील रक्तात बुचकळावी आणि तिने त्यातले रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीला व दोन्ही बाह्यांना लावावे, आणि सकाळपर्यंत कोणीही घराच्या दाराबाहेर जाऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 मग एजोब झाडाची जुडी घेऊन त्या पात्रातील कोकराच्या रक्तात बुचकाळावी आणि त्याचे रक्त दाराच्या दोन्ही बाजूंच्या चौकटींना व कपाळपट्टीवर लावावे, आणि सकाळपर्यंत कोणीही घराबाहेर जाऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 एजोबाची जुडी घेऊन ती पात्रात घेतलेल्या रक्तात बुडवा व त्याने ते रक्त घराच्या दरवाजाच्या बाजूंवर व कपाळपट्टीवर लावा. तुम्हापैकी कोणीही सकाळ होईपर्यंत आपल्या घराबाहेर पडू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 12:22
13 Iomraidhean Croise  

एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन; मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन.


ज्या घरात त्याचे मांस खायचे असेल त्या घराच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला त्याचे काही रक्त लावावे.


चला, माझ्या लोकांनो, आपापल्या खोल्यांत जा, दारे लावून घ्या; क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत थोडा वेळ लपून राहा.


आणि शुद्ध असलेल्या एखाद्या मनुष्याने एजोबाची जुडी घेऊन पाण्यात बुचकळावी व ते पाणी त्याने त्या डेर्‍यावर व तेथील सर्व पात्रे, माणसे ह्यांच्यावर शिंपडावे; तसेच ज्याने हाडाला, वधलेल्याला, मृताला किंवा कबरेला स्पर्श केला असेल त्याच्यावरही ते शिंपडावे;


नंतर गीत गाऊन ते जैतुनांच्या डोंगरावर निघून गेले.


त्याने ‘वल्हांडण सण’ व ‘रक्तसिंचन’ हे विधी विश्वासाने पाळले, ते अशा हेतूने की, प्रथमजन्मलेल्यांचा ‘नाश करणार्‍याने’ त्यांना शिवू नये.


नव्या कराराचा मध्यस्थ येशू, आणि शिंपडण्याचे रक्त ह्यांच्याजवळ आला आहात; त्या रक्ताचे बोलणे हाबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे.


पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व पवित्रस्थान होते; पण ते पृथ्वीवरचे होते.


तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सदसद्विवेकबुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषेकरून शुद्ध करील?


नियमशास्त्राप्रमाणे सर्व आज्ञा सर्व लोकांना सांगितल्यावर मोशेने पाणी, किरमिजी लोकर व एजोब वनस्पती व त्यांबरोबर वासरांचे व बकर्‍यांचे रक्त घेऊन ग्रंथावर व सर्व लोकांवरही सिंचन करत म्हटले,


कोणी तुझ्या घराबाहेर रस्त्यावर गेला तर त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्याच माथी राहील, आमच्यावर त्याचा दोष येणार नाही; पण घरात तुझ्याबरोबर जो असेल त्याच्यावर कोणी हात टाकला तर त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्या माथी राहील.


देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार, आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी व त्यांच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत, त्यांना येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याच्याकडून : तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळोत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan