Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 12:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मग मोशेने इस्राएलाच्या सर्व वडिलांना बोलावून म्हटले, “तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एकेक कोकरू निवडून घ्यावे आणि वल्हांडणाचा यज्ञपशू वधावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 मग मोशेने इस्राएली लोकांच्या सर्व वडीलधाऱ्या लोकांस एकत्र बोलावले. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एकएक कोकरू घ्यावे; आणि वल्हांडण सणाच्या यज्ञाकरिता त्याचा वध करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 मग मोशेने इस्राएलातील वडीलजनांना बोलाविले व म्हटले, “तुम्ही लगेच जा व आपआपल्या कुटुंबाप्रमाणे कोकरू निवडून घ्या व वल्हांडणाच्या कोकराचा वध करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 12:21
18 Iomraidhean Croise  

नंतर राजाने सर्व लोकांना आज्ञा दिली की, “ह्या कराराच्या ग्रंथात लिहिले आहे त्याप्रमाणे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळा.”


याजक व लेवी ह्यांनी एकचित्ताने आपणांस शुद्ध केले होते; ते शुद्ध झाले होते; त्यांनी बंदिवासातून परत आलेल्या सर्व लोकांसाठी, आपले भाऊबंद जे याजक त्यांच्यासाठी व स्वतःसाठी वल्हांडणपशू मारले.


ते तुम्ही ह्या रीतीने खावे : तुमच्या कंबरा कसून, पायांत जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे; हा परमेश्वराचा ‘वल्हांडण सण’ (ओलांडून जाण्याचा सण) होय.


तुम्ही खमिराचा कोणताही पदार्थ खाऊ नये; तुमच्या सर्व घरांत बेखमीर भाकरी खाव्यात.”


इस्राएलाच्या सर्व मंडळीला सांगा की, ह्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही आपापल्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे एकेका घराण्यामागे एकेक कोकरू घ्यावे;


परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू लोकांच्या पुढे जा, इस्राएलांतील काही वडील माणसे बरोबर घे आणि जी आपली काठी तू नील नदीवर आपटलीस ती हाती घेऊन चाल.


मग मोशेने येऊन लोकांच्या वडिलांना बोलावले आणि परमेश्वराने त्याला आज्ञापिलेले हे सर्व शब्द त्यांच्यापुढे मांडले.


तू जा आणि इस्राएलाच्या वडील जनांस जमवून सांग; तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा, इसहाकाचा व याकोबाचा देव परमेश्वर ह्याने मला दर्शन देऊन म्हटले की, माझे तुमच्यावर खरोखर लक्ष गेले आहे व मिसर देशात तुमचे काय होत आहे हे मला कळले आहे;


परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझ्या माहितीतले इस्राएल लोकांचे जे वडील व अंमलदार आहेत त्यांच्यातून सत्तर जण निवडून त्यांना दर्शनमंडपाजवळ माझ्याकडे घेऊन ये. तेथे त्यांनी तुझ्याबरोबर उभे राहावे.


आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले. कारण ते आपल्यामागे चालणार्‍या आध्यात्मिक खडकातून पीत होते; तो खडक तर ख्रिस्त होता. ह्या गोष्टींविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही.


त्याने ‘वल्हांडण सण’ व ‘रक्तसिंचन’ हे विधी विश्वासाने पाळले, ते अशा हेतूने की, प्रथमजन्मलेल्यांचा ‘नाश करणार्‍याने’ त्यांना शिवू नये.


इस्राएल लोकांनी गिलगालात तळ दिल्यावर यरीहोजवळच्या मैदानात त्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी वल्हांडण सण पाळला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan