Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 12:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 कारण ह्या रात्री मिसर देशात फिरून त्यातील मनुष्य व पशू ह्या सर्वांचे प्रथमजन्मलेले मी मारून टाकीन आणि मिसर देशातील सर्व देवांचे शासन करीन; मी परमेश्वर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 आज रात्री मी मिसर देशात फिरेन आणि त्यातील मनुष्य व पशू या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन, आणि मिसर देशातील सर्व दैवतांना शिक्षा करीन. मी परमेश्वर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 “कारण त्याच रात्री मी संपूर्ण इजिप्त देशामधून संचार करेन व सर्व मनुष्यांचे व जनावरांचे प्रथमवत्स मारून टाकेन आणि त्यांच्या सर्व दैवतांवर न्याय आणेन; मी याहवेह आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 12:12
26 Iomraidhean Croise  

तेथे पलिष्टी आपली दैवते टाकून गेले; तेव्हा दाविदाच्या आज्ञेने ती जाळून टाकली.


त्याने मिसर देशातील मनुष्यांचे व पशूंचेही प्रथमजन्मलेले मारून टाकले.


देव आपल्या मंडळीत उभा आहे; तो सत्ताधीशांमध्ये1 न्याय करतो;


मी म्हणालो, “तुम्ही देव आहात, तुम्ही सर्व परात्पराचे पुत्र आहात.


तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही;


कारण परमेश्वर थोर देव आहे; सर्व देवांहून तो थोर राजा आहे.


कारण परमेश्वर मिसर्‍यांचा वध करण्यासाठी देशातून फिरणार आहे; ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर व दोन्ही बाह्यांवर रक्त लावलेले परमेश्वर पाहील ते ते दार तो ओलांडून जाईल आणि नाश करणार्‍याला तुमचा नाश करण्यासाठी तुमच्या घरात शिरू देणार नाही.


आता मला कळून आले की, सर्व देवांहून परमेश्वर श्रेष्ठ आहे. ज्या बाबतीत मिसर्‍यांनी इस्राएलाशी ताठ्याने वर्तन केले त्या बाबतीतही तो श्रेष्ठ ठरला.”


तर त्याच्या धन्याने त्याला देवासमोर1 आणून दाराजवळ किंवा दाराच्या चौकटीजवळ उभे करावे व आरीने त्याचा कान टोचावा म्हणजे तो आयुष्यभर त्याची चाकरी करील.


तू देवाला1 दूषण लावू नकोस. आपल्या राज्यकर्त्याला शिव्याशाप देऊ नकोस.


देव मोशेशी बोलला; तो म्हणाला, “मी परमेश्वर आहे.


दुसर्‍या दिवशी परमेश्वराने ही गोष्ट केली आणि मिसर देशातील सर्व जनावरे मेली; तथापि इस्राएल लोकांच्या जनावरांपैकी एकही मेले नाही.


मिसर देशाविषयीची देववाणी; परमेश्वर शीघ्रगती मेघावर आरूढ होऊन मिसराकडे येत आहे; मिसरातील मूर्ती त्याच्यासमोर कापत आहेत आणि मिसराचे हृदय आतल्या आत विरघळत आहे.


शिवाय मी मिसरी दैवतांच्या गृहात अग्नी पेटवीन; तो राजा त्यांना जाळील व बंदिवान करून नेईल; मेंढपाळ आपले अंग जसे वस्त्राने वेष्टतो तसा तो मिसर देशाने स्वतःस वेष्टील व शांतीने तेथून निघून जाईल.


तो मिसर देशातले जे बेथ-शेमेश त्याचे स्तंभ मोडून टाकील व मिसर देशातील दैवतांची गृहे तो अग्नीने जाळील.”’


सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो : “पाहा नो येथला आमोन, फारो, मिसर व त्यांची दैवते आणि राजे, फारो व त्याच्यावर भिस्त ठेवणारे ह्यांचा मी समाचार घेईन.


तरी त्यांच्यापैकी थोडक्या लोकांना तलवार, दुष्काळ व मरी ह्यांपासून मी वाचवीन; म्हणजे ते ज्या ज्या राष्ट्रांत जातील तेथे आपल्या अमंगळ कृत्यांची कहाणी सांगतील; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”


द्राक्षीच्या प्रत्येक मळ्यात आक्रंदन होईल, कारण मी तुमच्या मधून जाईन,” असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वर त्यांना भयावह होईल; पृथ्वीवरच्या सर्व दैवतांचा तो क्षय करील; तेव्हा सर्व राष्ट्रद्वीपे व प्रत्येक जण आपापल्या स्थानी त्याला भजेल.


त्या वेळी मिसरी लोक परमेश्वराने ठार केलेल्या आपल्या ज्येष्ठ पुत्रांना मूठमाती देत होते; त्यांच्या देवांनाही परमेश्वराने शासन केले होते.


अश्दोदकर दुसर्‍या दिवशी पहाटेस उठून पाहतात तर दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्यांनी दागोनास उचलून त्याच्या जागी पुन्हा ठेवले.


ह्यास्तव ज्या ग्रंथींनी आणि उंदरांनी तुमच्या देशाचा नाश होत आहे त्यांच्या प्रतिमा करा; आणि इस्राएलाच्या देवाचा महिमा मान्य करा म्हणजे कदाचित तो तुमच्यावरला, तुमच्या देवांवरला व तुमच्या देशावरला आपला हात काढील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan