Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 12:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 ते तुम्ही ह्या रीतीने खावे : तुमच्या कंबरा कसून, पायांत जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे; हा परमेश्वराचा ‘वल्हांडण सण’ (ओलांडून जाण्याचा सण) होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 ते तुम्ही या प्रकारे खावे: तुमच्या कमरा कसून, पायांत जोडे घालून आणि हातात काठी घेऊन, ते घाईघाईने खावे; हा परमेश्वराचा वल्हांडण सण आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तुम्ही ते असे खावे: तुमच्या कंबरा बांधलेल्या, तुमची पायतणे पायात घातलेली व हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा याहवेहचा वल्हांडण आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 12:11
21 Iomraidhean Croise  

नंतर राजाने सर्व लोकांना आज्ञा दिली की, “ह्या कराराच्या ग्रंथात लिहिले आहे त्याप्रमाणे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळा.”


आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरता खूण असे होईल. आणि जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हांला ओलांडून जाईन. मिसर देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश होणार नाही.


मग मोशेने इस्राएलाच्या सर्व वडिलांना बोलावून म्हटले, “तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एकेक कोकरू निवडून घ्यावे आणि वल्हांडणाचा यज्ञपशू वधावा.


तेव्हा तुम्ही सांगा की, हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे; त्याने मिसरी लोकांना मारले व आमच्या घरांचा बचाव केला त्या समयी तो मिसरातील इस्राएलांची घरे ओलांडून गेला.” हे ऐकून लोकांनी मस्तके लववून दंडवत घातले.


परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला, “वल्हांडण सणाचा विधी असा : परदेशीयांपैकी कोणी त्यातले काही खाऊ नये;


तुम्हांला घाईघाईने निघावे लागणार नाही, पळ काढावा लागणार नाही; कारण परमेश्वर तुमचा पुढारी आहे; इस्राएलाचा देव तुमचा पाठीराखा आहे.


पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस तुम्ही वल्हांडण, म्हणजे पूर्ण एक सप्तकाचा सण पाळावा; ह्या सणात बेखमीर भाकर खावी.


पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी परमेश्वराचा वल्हांडण सण येतो.


पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस परमेश्वराचा वल्हांडण सण पाळावा.


इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसर्‍या वर्षाच्या पहिल्या महिन्यात परमेश्वर सीनाय रानात मोशेला म्हणाला,


तुमच्या कंबरा बांधलेल्या व दिवे लावलेले असू द्या;


पण बापाने आपल्या दासांना सांगितले, ‘लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायांत जोडे घाला,


त्याचे आईबाप दरवर्षी वल्हांडण सणास यरुशलेमेस जात असत.


आणि त्याच्या पायांशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली; तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले.


तर जुने खमीर काढून टाका, अशा हेतूने की, तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे, कारण आपला वल्हांडणाचा यज्ञपशू जो ख्रिस्त त्याचे आपल्यासाठी अर्पण झाले.


शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा,


अबीब महिना पाळून आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडण सण कर, कारण अबीब महिन्यातच तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मिसर देशातून रात्रीच्या वेळी बाहेर आणले.


इस्राएल लोकांनी गिलगालात तळ दिल्यावर यरीहोजवळच्या मैदानात त्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी वल्हांडण सण पाळला.


म्हणून तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळी तुम्हांला प्राप्त होणार्‍या कृपेवर पूर्ण आशा ठेवा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan