Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 11:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तेव्हा ते तुझे सर्व सेवक माझ्याकडे येऊन पाया पडून म्हणतील की, आपल्या परिवारासह आपण निघून जावे. त्यानंतर मी निघून जाईन.” मग मोशे रागाने संतप्त होऊन फारोपुढून निघून गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग हे सर्व तुमचे दास म्हणजे मिसरी लोक माझ्या पाया पडून माझी उपासना करतील. ते म्हणतील, तुम्ही तुमच्या सर्व लोकांसह व परिवारासह येथून निघून जा.” मग त्यानंतर रागाने संतप्त होऊन मोशे फारोला सोडून निघून गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तुझे हे सर्व सेवक माझ्याकडे येतील व माझ्या पाया पडून मला म्हणतील, ‘तू व तुझे अनुसरण करणारे सर्व लोक निघून जा!’ त्यानंतर मी निघून जाईन.” मग मोशे रागाने संतापून फारोहसमोरून निघून गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 11:8
18 Iomraidhean Croise  

बेन-हदादाने परत असा निरोप पाठवला की, “शोमरोनाची धूळ माझ्याबरोबरच्या लोकांना एकेक पसा पुरली तर देव माझे तसेच, किंबहुना त्याहूनही अधिक करोत.”


त्याप्रमाणे इस्राएलाचा राजा, यहूदाचा राजा आणि अदोमाचा राजा ह्यांनी कूच केले; त्यांनी वळसा घेऊन सात मजला केल्यानंतर सर्व सेना व त्यांच्याबरोबर असलेली जनावरे ह्यांना प्यायला पाणी मिळेना.


हे त्यांचे शब्द व ओरड ऐकून मला क्रोध आला.


हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नकोस; संतापून मला शिक्षा करू नकोस.


मोशे म्हणाला, “तू ठीक बोललास, मी पुन्हा तुझे तोंड कधीही पाहणार नाही.”


राजे बापासमान तुझे पालक होतील, त्यांच्या राण्या तुझ्या दाया होतील; ती तुला भूमीपर्यंत लवून नमन करतील. तुझ्या पायांची धूळ चाटतील; तेव्हा मी परमेश्वर आहे, माझी आस धरणारे फजीत होत नाहीत, असे तुला कळून येईल.”


तुझा छळ करणार्‍यांना स्वतःचेच मांस खायला लावीन; नव्या द्राक्षारसाने जसे लोक मस्त होतात तसे ते आपल्या रक्ताने मस्त होतील; ह्यावरून मी परमेश्वर तुझा त्राता, तुझा उद्धारकर्ता, याकोबाचा समर्थ प्रभू आहे हे सर्व मानवजातीला समजेल.”


मग आत्म्याने मला उचलून धरले, मी आपल्या मनाच्या संतापाने क्लेश पावलो, तेव्हा परमेश्वराचा वरदहस्त जोराने माझ्यावर आला.


हे ऐकून नबुखद्नेस्सर संतापला; शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांच्यासंबंधाने त्याची मुद्रा पालटली आणि त्याने आज्ञा केली की, ‘भट्टी नेहमीपेक्षा सातपट तप्त करा.’


मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता.


मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, “हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला.


तेव्हा ते, किंबहुना सर्व राष्ट्रांतले लोक विचारतील, ‘परमेश्वराने ह्या देशाचे असे का केले असावे? एवढा कोप भडकण्याचे कारण काय?’


ते भुकेने कासावीस होतील, प्रखर तापाने व भयंकर मरीने ग्रस्त होतील; श्वापदांचे दात व जमिनीवर सरपटणार्‍या प्राण्यांचे विष मी त्यांच्यावर पाठवीन.


त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने मिसर देश सोडला; कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.


पाहा, जे सैतानाच्या सभेचे असून आपणांला यहूदी म्हणवतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात; त्यांच्यापैकी कित्येकांना मी तुझ्या स्वाधीन करीन. पाहा, ते ‘येऊन तुझ्या पायांजवळ तुला नमन करतील’ व ‘मी तुझ्यावर प्रीती केली आहे’ हे त्यांना कळून येईल, असे मी करीन.


बाराकाने जबुलून व नफताली ह्यांना केदेश येथे बोलावले; मग त्याच्यामागोमाग दहा हजार पुरुष निघाले आणि दबोराही त्याच्याबरोबर गेली.


तेव्हा तो सुक्कोथ येथल्या लोकांना म्हणाला, “कृपया माझ्याबरोबरच्या लोकांना भाकरी द्या, कारण ते थकून गेले आहेत आणि मिद्यानाचे राजे जेबह व सलमुन्ना ह्यांचा मी पाठलाग करत आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan