Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 11:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 पूर्वी कधी झाला नव्हता आणि पुढे कधी होणार नाही असा मोठा हाहाकार मिसर देशभर उडेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मिसर देशात पूर्वी कधीही झाला नव्हता आणि भविष्यात कधीही होणार नाही असा मोठा आकांत होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 संपूर्ण इजिप्त देशभर पूर्वी कधी झाला नाही व पुढे कधी होणार नाही असा आकांत होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 11:6
15 Iomraidhean Croise  

तथापि इस्राएल लोकांपैकी कोणावरही, फार तर काय त्यांच्या पशूवरही, कुत्रादेखील भुंकणार नाही; ह्यावरून मी परमेश्वर मिसरी लोकांत व इस्राएल लोकांत कसा भेद ठेवतो हे तुम्हांला कळेल.


रात्रीच्या समयी फारो, त्याचे सर्व सेवक आणि सगळे मिसरी लोक जागे झाले; आणि मिसर देशात मोठा हाहाकार उडाला, कारण ज्यात कोणी मेला नव्हता असे एकही घर राहिले नव्हते.


परमेश्वर म्हणाला, “मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे, त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे; त्यांचे क्लेश मी जाणून आहे;


पाहा, उद्या ह्या वेळेस मी गारांची अशी भयंकर वृष्टी करीन की मिसरी राष्ट्राची स्थापना झाल्यापासून आजवर तशी वृष्टी झाली नाही.


गरिबाची आरोळी ऐकून जो कानांत बोटे घालतो तोही आरोळी करील पण कोणी ऐकणार नाही.


कारण मवाबाच्या प्रदेशात चोहोकडे आरडाओरड झाली आहे; त्यांचे आक्रंदन एग्लाइमापर्यंत, त्यांचा आक्रोश बैर-एलीमापर्यंत ऐकू जात आहे.


त्या काळी मिसरी लोक बायकांसारखे होतील; सेनाधीश परमेश्वर त्यांच्यावर आपला हात उगारील त्यामुळे ते थरथर कापतील व भयभीत होतील.


परमेश्वर असे म्हणतो, “रामात शोक व आकांत ह्यांचा शब्द ऐकू येत आहे; राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे; आपल्या मुलांमुळे ती सांत्वन पावत नाही, कारण ती नाहीत.”


मी धावा करतो व गार्‍हाणे करतो, तेव्हा तो माझ्या विनवणीस प्रतिबंध करतो.


द्राक्षीच्या प्रत्येक मळ्यात आक्रंदन होईल, कारण मी तुमच्या मधून जाईन,” असे परमेश्वर म्हणतो.


“त्या दिवशी मत्स्यवेशीतून ओरडण्याचा आवाज होईल, दुसर्‍या पेठेतून आक्रंदन होईल व टेकड्यांवरून मोठा धडाका उडेल,” असे परमेश्वर म्हणतो.


तुम्ही जेव्हा अब्राहाम, इसहाक, याकोब व सर्व संदेष्टे ह्यांना देवाच्या राज्यात असलेले व आपणांस बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तेथे रडणे व दात खाणे चालेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan