Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 11:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 अशा प्रकारे मिसरी लोकांची इस्राएल लोकांवर कृपादृष्टी होईल असे परमेश्वराने केले. शिवाय मिसर देशात फारोचे सेवक व सामान्य लोक ह्यांच्या दृष्टीने मोशे हा पुरुष अति थोर होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मिसरी लोकांची इस्राएली लोकांवर कृपादृष्टी होईल असे परमेश्वराने केले. मिसराचे सर्व लोक आणि फारोचे सेवक यांच्या दृष्टीने मोशे फार महान पुरुष होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 (आता याहवेहने इजिप्तमधील लोकांची मने इस्राएलांना अनुकूल होतील असे केले, मोशे स्वतः इजिप्तमध्ये फारोहच्या सेवकांच्या व इजिप्तच्या लोकांच्या दृष्टीत फार थोर झाला होता.)

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 11:3
14 Iomraidhean Croise  

मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन; तू आशीर्वादित होशील;


तथापि परमेश्वर योसेफाबरोबर असून त्याने त्याच्यावर दया केली, आणि त्या बंदिशाळेच्या अधिकार्‍याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले.


जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्याबरोबर राहिलो, आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तुझ्यापुढून उच्छेद केला; पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावांप्रमाणे तुझे नाव मी थोर करीन.


मर्दखयाचा राजदरबारी मोठा मान असून त्याची कीर्ती सर्व प्रांतांतून पसरली होती; मर्दखयाचा महिमा उत्तरोत्तर वाढत गेला.


त्यांचा पाडाव करणार्‍या सर्वांच्या मनात त्यांच्याविषयी त्याने दया उत्पन्न केली.


मोशेच्या सांगण्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले; त्यांनी मिसरी लोकांपासून सोन्याचांदीचे दागिने व वस्त्रे-प्रावरणे मागून घेतली;


मिसरी लोकांची कृपादृष्टी इस्राएल लोकांवर होईल असे परमेश्वराने केले, म्हणून त्यांनी जे जे मागितले ते ते त्यांनी त्यांना दिले. अशा प्रकारे त्यांनी मिसरी लोकांना लुटले.


आणि ह्या लोकांवर मिसरी लोकांची कृपादृष्टी होईल असे मी करीन; म्हणून तुम्ही निघाल तेव्हा रिकाम्या हाताने निघणार नाही;


तुला पीडा करणार्‍यांची मुले तुझ्याकडे नमत येतील, तुला तुच्छ मानणारे सर्व तुझ्या चरणी लोटांगण घालतील; तुला परमेश्वराचे नगर, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचे सीयोन म्हणतील.


मोशेला मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी होता.


परमेश्वराच्या प्रत्यक्ष परिचयाचा असा मोशेसमान कोणी संदेष्टा इस्राएलात आजवर झाला नाही;


मिसर देशात फारो व त्याचे सर्व सेवक ह्यांच्यापुढे आणि सबंध देशभर जी सर्व चिन्हे व चमत्कार करायला परमेश्वराने त्याला पाठवले त्या बाबतीत,


त्या दिवशी परमेश्वराने सर्व इस्राएलाच्या दृष्टीने यहोशवाची थोरवी वाढवली; म्हणून जसे ते मोशेचे भय धरत तसेच त्यांनी यहोशवाचे भय त्याच्या सगळ्या हयातीत बाळगले.


पाहा, जे सैतानाच्या सभेचे असून आपणांला यहूदी म्हणवतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात; त्यांच्यापैकी कित्येकांना मी तुझ्या स्वाधीन करीन. पाहा, ते ‘येऊन तुझ्या पायांजवळ तुला नमन करतील’ व ‘मी तुझ्यावर प्रीती केली आहे’ हे त्यांना कळून येईल, असे मी करीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan