Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 10:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मोशेने म्हटले, “आम्ही आमचे तरुण व म्हातारे ह्यांच्यासह जाऊ; आमचे मुलगे, आमच्या मुली, आमची शेरडेमेंढरे आणि आमची गुरेढोरे ह्या सर्वांना घेऊन आम्ही जाणार; कारण परमेश्वराप्रीत्यर्थ आम्हांला उत्सव करायचा आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मोशेने उत्तर दिले, “आमची तरुण व वृध्द मंडळी, तसेच आम्ही, आमची मुले व कन्या, आमचे शेरडामेंढरांचे कळप व गुरेढोरे या सर्वांस आम्ही घेऊन जाणार. कारण आम्हांला परमेश्वराचा उत्सव करायचा आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मोशेने उत्तर दिले “आम्ही आमचे तरुण व वृद्ध, आमचे पुत्र व कन्या आणि आमची शेरडेमेंढरे व गुरे या सर्वांसह जाणार. कारण आम्ही सर्वांनीच याहवेहचा सण साजरा करणे आवश्यक आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 10:9
19 Iomraidhean Croise  

योसेफाच्या घरचे सर्व लोक त्याचे भाऊ आणि त्याच्या बापाच्या घरचे लोक त्याच्याबरोबर गेले; आपली मुलेबाळे, शेरडेमेंढरे, गुरेढोरे ही मात्र त्यांनी गोशेन प्रांतातच मागे ठेवली.


तो त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला तुमच्या मुलाबाळांसह जाऊ दिले तर परमेश्वर तुमच्याबरोबर असो! खबरदार, तुमच्या मनात वाईट हेतू आहे.


आमचे पशूही आमच्याबरोबर गेले पाहिजेत, एक खूरही मागे राहता कामा नये; कारण ह्यांतूनच आमचा देव परमेश्वर ह्याच्या सेवेसाठी यज्ञपशू घ्यावे लागतील; आणि परमेश्वराच्या सेवेला काय लागेल ते आम्हांला तेथे जाऊन पोहचेपर्यंत कळायचे नाही.”


तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपली शेरडेमेंढरे व गुरेढोरे घेऊन चालते व्हा; आणि मलाही आशीर्वाद द्या.


मग इस्राएल लोक रामसेस येथून कूच करून सुक्कोथ येथे गेले; जे पुरुष पायी गेले ते मुलाबाळांशिवाय सुमारे सहा लाख होते.


त्यांच्याबरोबर एक मिश्र समुदायसुद्धा गेला; तशीच शेरडेमेंढरे, गुरेढोरे वगैरे पुष्कळ जनावरे गेली.


सात दिवस बेखमीर भाकरी खाव्यात आणि सातव्या दिवशी परमेश्वरासाठी सण पाळावा.


तुझे सांगणे ते ऐकतील; मग तू आणि इस्राएलाचे वडील जन मिसर देशाच्या राजाकडे जा व त्याला सांगा, इब्र्यांचा देव परमेश्वर आम्हांला भेटला आहे; तर आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करावा, म्हणून आम्हांला तीन दिवसांच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे;


नंतर मोशे व अहरोन फारोकडे जाऊन म्हणाले, “इस्राएलाचा देव परमेश्वर सांगत आहे की, माझ्या लोकांनी माझ्याप्रीत्यर्थ रानात उत्सव1 करावा म्हणून त्यांना जाऊ द्यावे.”


ते म्हणाले, “इब्र्यांच्या देवाने आम्हांला भेट दिली; तर आता आम्हांला तीन दिवसांच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे आणि आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करू द्यावा; असे न केल्यास तो कदाचित पटकीने अथवा तलवारीने आमचा समाचार घेईल.”


तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथमफळाने परमेश्वराचा सन्मान कर;


आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर; पाहा, अनिष्ट दिवस येत आहेत, आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की, त्यांत “मला काही सुख नाही” असे तू म्हणशील.


सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी तुम्ही कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये, आणि परमेश्वराप्रीत्यर्थ सात दिवस सण पाळावा;


बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.


परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हांला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा; महानदीपलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोर्‍यांच्या देवांची? मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan