Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 10:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मग मोशे आणि अहरोन फारोकडे आत जाऊन त्याला म्हणाले, “इब्री लोकांचा देव परमेश्वर असे म्हणतो, ‘तू माझ्यासमोर नमायला कोठवर नाकारशील? माझ्या लोकांना माझी सेवा करायला जाऊ दे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मग मोशे व अहरोन फारोकडे गेले. त्यांनी त्यास सांगितले, “इब्र्यांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘तू माझ्यापुढे नम्र होण्याचे कोठवर नाकारशील? माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांस जाऊ दे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मग मोशे व अहरोन फारोहकडे गेले व त्याला म्हणाले, “इब्री लोकांचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात, ‘अजून किती काळ माझ्यासमोर नम्र होण्यास तू नाकारशील? माझ्या लोकांना जाऊ दे, म्हणजे ते माझी उपासना करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 10:3
28 Iomraidhean Croise  

एलीया सर्व लोकांच्या सन्निध येऊन म्हणाला, “तुम्ही दोन्ही मतांमध्ये कोठवर लटपटाल? परमेश्वर हा देव असला तर त्याच्या भजनी लागा; बआल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा.” लोकांनी त्याला एका शब्दानेही उत्तर दिले नाही.


“अहाब माझ्यापुढे कसा दीन झाला आहे हे तू पाहतोस ना? तो माझ्यापुढे दीन झाला आहे म्हणून मी हे अरिष्ट त्याच्या हयातीत आणणार नाही, तर त्याच्या पुत्राच्या हयातीत त्याच्या घराण्यावर हे अरिष्ट आणीन.”


तू ही वचने ऐकून दीन झालास, आणि हे स्थान व ह्यातील रहिवासीही विस्मयाला व शापाला विषय होतील असे जे मी बोललो आहे ते ऐकून परमेश्वरापुढे नम्र झालास, तू आपली वस्त्रे फाडलीस व माझ्यासमोर रडलास ह्यामुळे मी तुझी विनंती ऐकली आहे, असे परमेश्वर म्हणतो.


तो संकटात पडला तेव्हा तो आपला देव परमेश्वर ह्याला शरण गेला आणि आपल्या पूर्वजांच्या देवासमोर फार दीन झाला.


त्याने केलेली प्रार्थना ती कशी मान्य झाली ते, त्याचे सर्व पाप व अपराध, तो दीन होण्यापूर्वी त्याने उच्च स्थाने कोठेकोठे बांधली ते आणि अशेरा मूर्ती व कोरीव मूर्ती त्याने कशा उभारल्या ते सर्व द्रष्ट्यांच्या1 बखरीत लिहिले आहे.


तुझे हृदय मृदू झाले, तू देवापुढे नम्र झालास आणि ह्या स्थानाविरुद्ध व येथल्या रहिवाशांविरुद्ध मी सांगितले ते ऐकून तू दीन होऊन आपली वस्त्रे फाडून माझ्यासमोर रडलास, म्हणून मी तुझी विनंती ऐकली आहे, असे परमेश्वर म्हणतो.


तर माझे नाम ज्यांना दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गांपासून परावृत्त झाले तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यांना क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन.


म्हणून मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्‍चात्ताप करीत आहे.”


तू माझ्या लोकांना जाऊ देण्याचे नाकारशील तर पाहा, मी उद्या तुझ्या देशात टोळ आणीन;


तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, “माझ्या आज्ञा व माझे नियम पाळायचे तुम्ही कोठवर नाकारणार?


मी तुला सांगितले की, “माझ्या पुत्राला माझी सेवा करण्यास जाऊ दे”; पण तू त्याला जाऊ देण्याचे नाकारले, तर पाहा, मी तुझा पुत्र, तुझा ज्येष्ठ पुत्र जिवे मारीन.”’


नंतर मोशे व अहरोन फारोकडे जाऊन म्हणाले, “इस्राएलाचा देव परमेश्वर सांगत आहे की, माझ्या लोकांनी माझ्याप्रीत्यर्थ रानात उत्सव1 करावा म्हणून त्यांना जाऊ द्यावे.”


तू अद्यापि माझ्या लोकांशी चढेलपणाने वागून त्यांना जाऊ देत नाहीस काय?


“अहो भोळ्यांनो, तुमचे भोळेपण तुम्हांला कोठवर आवडणार? निंदा करणारे निंदेत कोठवर आनंद पावणार, आणि मूर्ख लोक ज्ञानाचा तिटकारा कोठवर करणार?


मी हाक मारली पण तुम्ही आला नाहीत; मी आपला हात पुढे केला, पण कोणी लक्ष दिले नाही;


नाशापूर्वी मनुष्याचे अंत:करण गर्विष्ठ असते; आधी नम्रता मग मान्यता.


तुम्ही अधिकाधिक फितून मार का खात राहता? हरएक मस्तक व्यथित झाले आहे, हरएक हृदय ग्लान झाले आहे.


त्या दिवशी लोकांची उन्मत्त दृष्टी नीच होईल, माणसांचा गर्व उतरेल; व परमेश्वरच काय तो उच्च स्थानी विराजेल.


ते दुष्ट लोक माझी वचने ऐकत नाहीत, ते आपल्या अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालतात आणि अन्य देवांची सेवा करण्यास व त्यांना भजण्यास त्यांच्यामागे जातात म्हणून त्यांची गती ह्या निरुपयोगी झालेल्या कमरबंदाप्रमाणे होईल.


राजाला व राजमातेला सांग, “आसनावरून खाली बसा; कारण तुमच्या वैभवाचा मुकुट तुमच्या शिरावरून खाली पडत आहे.”


बाबेलवर तिरंदाज, सर्व धनुर्धारी ह्यांना जमवा; त्याच्या सभोवती तळ द्या; त्याचा काही निभाव लागू देऊ नका; त्याच्या कृतीप्रमाणे त्याला प्रतिफळ द्या; जे सर्व त्याने केले तसे त्याला करा; कारण त्याने परमेश्वराविरुद्ध, इस्राएलाच्या पवित्र प्रभूविरुद्ध तोरा मिरवला आहे.


तरी तिने दुष्ट आचरण करून माझ्या निर्णयांना इतर राष्ट्रांपेक्षाही अधिक विरोध केला, तिने सभोवतालच्या प्रदेशांपेक्षाही माझ्या नियमांचा अधिक विरोध केला; कारण त्यांनी माझ्या निर्णयांचा अव्हेर केला व माझ्या नियमाप्रमाणे ते चालले नाहीत.


हे बेलशस्सरा, तू त्याचा पुत्र आहेस. हे सर्व तुला ठाऊक असून तू आपले मन नम्र केले नाहीस;


“ही दुष्ट मंडळी कोठवर माझ्याविरुद्ध कुरकुर करीत राहणार? हे जे इस्राएल लोक माझ्याविरुद्ध कुरकुर करीत आहेत त्यांची कुरकुर माझ्या कानावर आली आहे;


किंवा देवाची ममता तुला पश्‍चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय?


जो बोलत आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा; कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणार्‍याचा अवमान करणारे जर निभावले नाहीत, तर स्वर्गातून आज्ञा सांगणार्‍यापासून बहकल्यास आपण विशेषेकरून निभावणार नाही.


प्रभूसमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हांला उच्च करील.


म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की, त्याने योग्य वेळी तुम्हांला उंच करावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan