Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 10:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “आकाशाकडे आपला हात उगार म्हणजे मिसर देशावर अंधार पडेल, इतका की तो हाताला लागेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपला हात आकाशात उंच कर म्हणजे अवघा मिसर देश अंधारात गडप होईल तो अंधार इतका दाट असेल की तुम्हास चाचपडत जावे लागेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 नंतर याहवेहने मोशेला म्हटले, “तू आपला हात वर आकाशाकडे लांब कर, म्हणजे इजिप्त देशावर अंधार पडेल—इतका अंधार की त्याला लोक चाचपडतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 10:21
23 Iomraidhean Croise  

काळोख त्यांना भर दिवसा गाठतो, भर दुपारी ते जसे काय रात्रीच्यासारखे चाचपडतात.


त्याने अंधकार पाठवून काळोख पाडला, आणि त्यांनी त्याच्या आज्ञांचे उल्लंघन केले.1


त्यांचा मार्ग अंधकारमय व निसरडा होवो, परमेश्वराचा दूत त्यांच्या पाठीस लागो.


त्याने त्यांच्यावर आपला कोपाग्नी, क्रोध, रोष व संकट ह्या अनिष्टकारक दूतांची स्वारी सोडली.


मग परमेश्वराने मोशेला म्हटले, “तू अहरोनाला सांग की, ‘आपली काठी घेऊन मिसर देशात जितके पाणी म्हणून आहे म्हणजे त्यातल्या नद्या, नाले, तलाव व हौद ह्या सर्वांवर आपला हात उगार म्हणजे त्या सर्वांच्या पाण्याचे रक्त बनेल; आणि मिसरातील काष्ठपाषाणांच्या सर्व पात्रांत रक्तच रक्त होईल.”’


मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू आपला हात आकाशाकडे उगार म्हणजे सर्व मिसर देशावर गारांची वृष्टी होईल; मिसर देशातील माणसांवर, गुरांवर व शेतातील प्रत्येक वनस्पतीवर ती होईल.”


दुर्जनांचा मार्ग अंधकारासारखा आहे; त्यांना कशाची ठेच लागते हे त्यांना कळत नाही.


ज्ञान्याचे नेत्र त्याच्या मस्तकात असतात; आणि मूर्ख अंधकारात चालतो; असे असून सर्वांची गती एकच आहे असे माझ्या लक्षात आले.


कारण तो शून्यावस्थेत येतो व अंधकारात नाहीसा होतो; त्याचे नाव अंधकाराने व्याप्त राहते.


मी तुला नष्ट करीन तेव्हा मी आकाश झाकीन व त्यातील तारे निस्तेज करीन; मी सूर्य मेघाच्छादित करीन, चंद्र प्रकाश देणार नाही.


मग दुपारी सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला.


सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला.


आता सुमारे दोन प्रहर झाले, आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन तिसर्‍या प्रहरापर्यंत सर्व देशभर अंधार पडला;


तुमचा देव परमेश्वर तुमचा अग्रगामी आहे, त्याने मिसर देशात तुमच्यादेखत जे जे केले, ते ते सर्व करून तो तुमच्यासाठी लढेल;


आंधळा जसा चाचपडतो तसा तू भरदुपारी चाचपडत फिरशील; तुझे कोणतेही काम सफळ होणार नाही. तुझा एकसारखा छळ होईल व तुझी नागवणूक होईल; पण तुझा बचाव करणारा कोणी असणार नाही.


त्याप्रमाणेच तुमचा देव परमेश्वर ह्याने मिसर देशातून तुमच्यासाठी तुमच्यादेखत संकटे, चिन्हे, चमत्कार, युद्धे, पराक्रमी बाहू आणि उगारलेला हात ह्यांच्या योगे भयप्रद कृत्ये केली तशी कृत्ये करून देवाने आपल्यासाठी एखादे राष्ट्र इतर राष्ट्रांमधून काढून घेण्याचा कधी प्रयत्न केला काय?


ते निर्जल झरे, वादळाने उडवलेले धुके, असे आहेत; त्यांच्यासाठी घनांधकाराची काळोखी सर्वकाल राखलेली आहे.


कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही; तर त्यांना नरकात2 टाकले आणि न्यायनिवाड्याकरता अंधकारमय खाड्यात3 राखून ठेवले;


ते लज्जारूपी फेस दाखवणार्‍या समुद्राच्या विक्राळ लाटा, भ्रमण करणारे तारे, असे आहेत; त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्वकाळ राखून ठेवलेला आहे.


आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न राखता आपले वसतिस्थान सोडले, त्यांना त्याने निरंतरच्या बंधनात, निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरता राखून ठेवले.


चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा सूर्याचा एक तृतीयांश, चंद्राचा एक तृतीयांश व तार्‍यांचा एक तृतीयांश ह्यांवर प्रहार झाला. त्यांचा तृतीयांश अंधकारमय व्हावा आणि दिवसाच्या तसे रात्रीच्याही तृतीयांशात प्रकाश दिसू नये म्हणून असे झाले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan