Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 10:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मी परमेश्वर आहे हे तुम्हांला कळावे म्हणून मी मिसर्‍यांची कशी फजिती केली आणि त्यांच्यामध्ये काय काय चिन्हे प्रकट केली ते तुझ्या पुत्रपौत्रांच्या कानी जाऊ दे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मी मिसऱ्यांना कसे कठोरपणे वागवले आणि त्यांच्यामध्ये अनेक सामर्थ्याची चिन्हे कशी केली हे तुम्ही तुमच्या मुलांना व नातवांना सांगावे म्हणून मी हे केले. या प्रकारे मी परमेश्वर आहे हे तुम्हास कळेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 व तुम्हीही आपल्या लेकरांस व नातवंडास मी इजिप्तच्या लोकांशी कसे कठोरपणे वागलो व त्यांच्यामध्ये माझे चमत्कार कसे केले ते सांगावे आणि तुम्हाला समजावे की मी याहवेह आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 10:2
22 Iomraidhean Croise  

ह्यास्तव हे प्रभू परमेश्वरा, तू थोर आहेस; जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे त्यावरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही; तुझ्याशिवाय अन्य देव नाही.


हे देवा, आमच्या पूर्वजांच्या दिवसांत, पुरातन काळी, तू जे कार्य केलेस त्याचे वर्णन त्यांनी केले, व ते आम्ही आपल्या कानांनी ऐकले.


तू आपल्या हाताने राष्ट्रांना घालवून तेथे ह्यांना स्थापले; त्या लोकांना क्लेश देऊन ह्यांचा विस्तार केला.


तेव्हा माणसे म्हणतील की, “नीतिमानास खचीत फलप्राप्ती होते, खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे.”


मी भावी पिढीला तुझे बाहुबल विदित करीपर्यंत पुढच्या पिढीतील सर्वांना तुझ्या पराक्रमाचे वर्णन करीपर्यंत, मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी, हे देवा, मला सोडू नकोस.


ज्या आम्ही ऐकल्या, ज्या आम्हांला समजल्या, आमच्या वडिलांनी ज्या आम्हांला सांगितल्या,


पुढील काळी तुझा मुलगा तुला विचारील की हे काय आहे? तेव्हा त्याला सांग, ‘मिसर देशातून, दास्यगृहातून परमेश्वराने आम्हांला आपल्या भुजबलाने बाहेर आणले,


फारो, त्याचे रथ व त्याचे स्वार ह्यांच्या (पराभवा) कडून माझे गौरव झाल्याने मी परमेश्वर आहे हे मिसरी लोक ओळखतील.”


मी फारोचे मन कठीण करीन आणि तो त्यांचा पाठलाग करील; ह्या प्रकारे फारो व त्याची सर्व सेना ह्यांच्या पराभवाकडून मला गौरव मिळेल, आणि मी परमेश्वर आहे हे मिसरी लोक ओळखतील.” मग त्याप्रमाणे त्यांनी केले.


परमेश्वर म्हणतो की, ‘मी परमेश्वर आहे हे तुला ह्यावरून कळेल : पाहा, मी आपल्या हातातली काठी नदीतल्या पाण्यावर मारीन तेव्हा त्या पाण्याचे रक्त होईल.


आणि मिसरावर मी आपला हात उभारून त्यांच्यामधून इस्राएल लोकांना बाहेर काढीन तेव्हा मिसर्‍यांना कळेल की, मी परमेश्वर आहे.”


अहरोनाने मिसरातील जलाशयांवर आपला हात उगारला तेव्हा बेडूक बाहेर निघाले, आणि त्यांनी मिसर देश व्यापून टाकला.


जिवंत, जिवंत माणूसच तुझा धन्यवाद करतो तसा मी आज करीत आहे. बाप तुझे सत्य मुलास प्रकट करतो.


मी त्यांची नासधूस केल्याने त्यांना असे समजावे की मी परमेश्वर आहे; मी त्यांना त्यांच्या यज्ञार्पणासंबंधाने असे भ्रष्ट केले की त्यांनी गर्भाशयातून प्रथम निघालेल्यांचा अग्नीत होम केला.


मी आपला हात उचलून शपथ करून दिलेल्या देशात त्यांना आणले तेव्हा त्यांनी प्रत्येक उंच टेकडी व प्रत्येक दाट छायेचा वृक्ष पाहून तेथे आपले यज्ञबली अर्पण केले; तेथे संतापवण्याजोगी अर्पणे त्यांनी केली; तेथे त्यांनी सुवासिक धूप जाळला व तेथेच त्यांनी आपली पेयार्पणेही वाहिली.


तुम्ही हे आपल्या मुलाबाळांना कळवा, तुमच्या मुलांनी आपल्या मुलाबाळांना कळवावे व त्यांच्या मुलांनी आपल्या पुढच्या पिढीस कळवावे.


बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.


मात्र स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वत:ला फार जप, नाहीतर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील; तू आपल्या पुत्रपौत्रांना त्यांची माहिती द्यावी;


Lean sinn:

Sanasan


Sanasan