निर्गम 10:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्यांनी सर्व भूमी झाकून टाकल्यामुळे सार्या देशावर अंधार पडला; आणि त्यांनी भूमीवरील सर्व वनस्पती आणि गारांच्या वृष्टीतून वाचलेली सर्व फळेही खाऊन टाकली. सर्व मिसर देशात झाडांपैकी किंवा शेतातील वनस्पतींपैकी हिरवे म्हणून काही उरले नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 त्या टोळांनी सर्व जमीन झाकून टाकली, आणि त्यांच्या आकाशात उडण्यामुळे सर्व देशभर अंधार पडला. गारांच्या तडाख्यातून वाचलेल्या वनस्पती आणि झाडावरील वाचलेली फळे त्यांनी खाऊन फस्त केली; आणि मिसरातील कुठल्याच झाडाझुडपांवर एकही पान राहिले नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 कारण टोळांनी जमिनीचा पृष्ठभाग अगदी काळा होईपर्यंत झाकून टाकला व गारातून जे वाचले होते ते सर्वकाही—शेतातील सर्व पीक व झाडावरील प्रत्येक फळ त्यांनी फस्त केले. संपूर्ण इजिप्त देशात ना झाडे ना वनस्पती, काहीही हिरवे असे राहिले नाही. Faic an caibideil |