Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 1:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तो आपल्या लोकांना म्हणाला, “पाहा, ह्या इस्राएल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने व बलाने अधिक झाले आहेत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तो आपल्या लोकांस म्हणाला, “इस्राएली वंशाच्या लोकांकडे पाहा, ते पुष्कळ अधिक आहेत व आपल्यापेक्षा शक्तीमानही झाले आहेत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 त्याने आपल्या लोकांना सांगितले, “पाहा, इस्राएली लोक संख्येने आपल्यापेक्षा जास्त आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 1:9
12 Iomraidhean Croise  

अबीमलेख इसहाकाला म्हणाला, “तू आमच्यातून निघून जा, कारण तू आमच्याहून फारच सामर्थ्यवान झाला आहेस.”


तो म्हणाला, “मी देव, तुझ्या पित्याचा देव आहे; तू मिसरात जायला भिऊ नकोस; तेथे तुझे मी एक मोठे राष्ट्र करीन.


मूर्ख तर चिंता करून करून नाश पावतो; वेडा मत्सराने मरतो.


फारो आणखी म्हणाला, “पाहा, देशातले लोक आता पुष्कळ आहेत, आणि तुम्ही त्यांना बिगारकाम सोडून जायला लावणार.”


प्रजावृद्धीत राजाचे वैभव असते; प्रजा नसल्याने अधिपतीचा नाश होतो.


क्रोधाची निष्ठुरता व कोपाचा तडाखा ही पुरवली पण प्रेमसंशयापुढे कोण टिकेल?


मग मी सर्व उद्योग व कारागिरी पाहिली; ही सर्व चढाओढींमुळे होतात. हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.


कारण आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा ह्यांत आयुष्य घालवणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो;


“जो आत्मा आपल्या ठायी वस्ती करतो त्याला आपल्याविषयी ईर्ष्या वाटते” हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हांला वाटते काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan