Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 1:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 ह्याबद्दल देवाने सुइणींचे कल्याण केले, इस्राएल लोक तर बहुगुणित होऊन फार प्रबल झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 त्याबद्दल देवाने त्या सुइणींचे कल्याण केले. इस्राएल लोक तर अधिक वाढून फार बलवान झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 म्हणून परमेश्वराने त्या सुइणींना आशीर्वाद दिला आणि इस्राएली लोक बहुगुणित झाले व संख्येने फार अधिक झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 1:20
17 Iomraidhean Croise  

कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्यांचे भय धरणार्‍यांवर विपुल आहे.


त्याने आपले भय धरणार्‍यांना अन्न दिले आहे; तो आपला करार सदा स्मरतो.


तो आपले भय धरणार्‍यांची इच्छा पुरवतो; व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारतो.


कारण, हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस; तुझ्या नावाचे भय धरणार्‍यांचे वतन तू मला दिले आहेस;


खरोखर त्याचे भय धरणार्‍यांना त्याने सिद्ध केलेले तारण समीप असते; ह्यासाठी की आमच्या देशात वैभव नांदावे.


पण जितके अधिक त्यांनी त्यांना जाचले, तितके अधिक ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चोहोकडे विस्तार झाला. त्यांना इस्राएलवंशजांचा तिटकारा वाटू लागला;


त्या सुइणी फारोला म्हणाल्या, “इब्री बायका काही मिसरी बायकांप्रमाणे नाहीत; त्या फार जोमदार आहेत, आणि सुईण जाऊन पोचण्यापूर्वीच त्या प्रसूत होतात.”


इस्राएलवंशज फलद्रूप झाले व अतिशय वृद्धी पावून बहुगुणित झाले; ते महाप्रबळ होऊन त्यांनी देश भरून गेला.


दुर्जन वेतन मिळवतो ते बेभरवशाचे असते; परंतु जो नीतीचे बीजारोपण करतो त्याचे वेतन खातरीचे असते.


जो दरिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो; त्याच्या सत्कृत्यांची फेड परमेश्वर करील.


पापी शंभरदा पाप करून पुष्कळ दिवस वाचला तरी माझी खातरी आहे की देवाचे भय बाळगणारे जे त्याला भिऊन वागतात त्यांचे कल्याणच होईल;


नीतिमानांविषयी म्हणा की त्यांचे कल्याण होणार; कारण ते आपल्या कृत्यांचे फळ उपभोगणार.


आणि ह्या लहानांतील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही असे मी तुम्हांला खचीत सांगतो.”


तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो की, ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे.’


आणि जे ‘त्याचे भय धरतात, त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे.’


कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan