Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 1:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 त्या सुइणी देवाचे भय बाळगणार्‍या होत्या, म्हणून त्यांनी मिसरी राजाच्या हुकमाप्रमाणे न करता मुलगेही जिवंत राहू दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 परंतु त्या इब्री सुइणी देवाचे भय व आदर धरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या होत्या, म्हणून त्यांनी मिसरी राजाची आज्ञा मानली नाही; तर त्यांनी जन्मणाऱ्या मुलांनाही जिवंत ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 पण त्या सुइणी परमेश्वराचे भय धरणार्‍या होत्या, म्हणून त्यांनी इजिप्तच्या राजाने सांगितल्याप्रमाणे केले नाही; तर मुलांनाही जिवंत राहू दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 1:17
22 Iomraidhean Croise  

अब्राहाम म्हणाला, “ह्या ठिकाणी देवाचे भय अगदी नाही, म्हणून हे लोक माझ्या बायकोसाठी माझा घात करतील असे मला वाटले.


योसेफ त्यांना तिसर्‍या दिवशी म्हणाला, “मी देवाचे भय बाळगणारा आहे, म्हणून हेच करा म्हणजे तुमचा जीव वाचेल;


तथापि राजाच्या म्हणण्यापुढे यवाब व सैन्याचे सरदार ह्यांचे काही चालेना, आणि यवाब व सैन्यांचे सरदार राजापुढून इस्राएल लोकांची मोजदाद करण्यासाठी निघून गेले.


माझ्या पूर्वीचे अधिपती प्रजेवर बोजा लादत व त्यांच्यापासून भाकरी, द्राक्षारस घेऊन आणखी चाळीस शेकेल चांदी घेत असत. त्यांचे सेवकदेखील लोकांवर अधिकार गाजवत, पण मी तसे केले नाही, कारण मला देवाचे भय होते.


तेव्हा राजद्वारातील राजसेवकांनी मर्दखयास विचारले की, “तू राजाज्ञेचे का उल्लंघन करतोस?”


तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणार्‍यांकरता तू ते साठवून ठेवले आहेस, तुझा आश्रय करणार्‍यांसाठी मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहेस.


तेव्हा मिसरी राजाने त्या सुइणींना बोलावून विचारले, “तुम्ही हे का केले? मुलगे का जिवंत राहू दिले?”


त्या सुइणी देवाचे भय बाळगणार्‍या होत्या म्हणून त्याने त्यांची घराणी स्थापित केली.


दया व सत्य ह्यांच्या योगाने पापाचे क्षालन होते, आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने माणसे दुष्कर्मापासून दूर राहतात.


परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय; गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी ह्यांचा मी द्वेष करते.


आता सर्वकाही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.


पापी शंभरदा पाप करून पुष्कळ दिवस वाचला तरी माझी खातरी आहे की देवाचे भय बाळगणारे जे त्याला भिऊन वागतात त्यांचे कल्याणच होईल;


तेव्हा ते राजाला म्हणाले, “महाराज, पकडून आणलेल्या यहूद्यांपैकी तो दानीएल आपणाला व आपण सही केलेल्या द्वाहीला जुमानत नाही; तर तो नित्य तीनदा प्रार्थना करतो.”


एफ्राइमाला पीडा झाली आहे, त्याच्या हक्काची पायमल्ली झाली आहे; कारण तो स्वेच्छेने शून्याच्या मागे लागला.


अम्रीचे कायदे तुम्ही पाळता, अहाबाच्या घराण्याच्या चालीरीती तुम्ही पाळता, व त्यांच्या तत्त्वांप्रमाणे तुम्ही चालता, म्हणून तुमचा नाश होईल, त्याच्या रहिवाशांची निर्भर्त्सना होईल असे मी करीन; माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हांला सोसावी लागेल.”


जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या.


तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हांला सुचवून ठेवतो. वध केल्यावर नरकात टाकायचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा; हो, मी तुम्हांला सांगतो, त्याचीच भीती बाळगा.


परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.


तेव्हा जवळ प्यादे उभे होते त्यांना राजा म्हणाला, “चला, परमेश्वराच्या याजकांचा वध करा; कारण त्यांनी दाविदाशी हातमिळवणी केली आहे; तो पळून गेला हे त्यांना ठाऊक असूनही त्यांनी माझ्या कानावर घातले नाही;” पण परमेश्वराच्या याजकांवर राजाचे सेवक आपला हात टाकीनात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan