Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 1:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 त्यांना मातीचा गारा व विटा करायला आणि शेतात हरतर्‍हेची कामे करायला लावत. असल्या बिकट कामाने त्यांना जीव नकोसा झाला; कारण ही सर्व कामे मोठ्या सक्तीची असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 अशाप्रकारे त्यांनी इस्राएल लोकांचे जीवन फारच कठीण काबाडकष्टांचे व हाल अपेष्टांचे केले; त्यांनी त्यांना विटा बनविण्याची, बांधकामासाठी चुना बनविण्याची तसेच शेतीची व इतर अतिशय कठीण व कष्टाची कामे बळजबरीने करायला लावली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 विटा व चुन्यातील कष्टाच्या कामाने त्यांचे जीवन कठीण केले आणि शेतातील प्रत्येक प्रकारच्या कष्टाच्या कामात त्यांच्याशी इजिप्तचे लोक कठोरतेने वागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 1:14
30 Iomraidhean Croise  

परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू निश्‍चितपणे समज की जो देश स्वत:चा नाही, अशा देशात तुझे संतान उपरे होऊन राहील व तेथील लोकांचे दास्य करील, आणि ते लोक चारशे वर्षे त्यांना छळतील.


त्या तरुणांच्या सल्ल्याप्रमाणे तो त्यांना म्हणाला, “माझ्या बापाने तुमच्यावर भारी जू लादले होते, पण मी ते अधिक भारी करणार; माझा बाप, तुम्हांला आसुडांनी ताडन करीत असे, मी तर तुम्हाला विंचवांनी ताडन करीन.”


आता इस्राएलाने म्हणावे की, “माझ्या तरुणपणापासून त्यांनी मला फार पिडले आहे;”


तुम्ही मेंढवाड्यामध्ये1 पडून राहता काय? ज्याचे पंख रुप्याने व पिसे पिवळ्या सोन्याने मंडित आहेत, अशा कबुतरासारखे तुम्ही आहात ना?


“मी त्याच्या खांद्यावरील भार काढला आहे; त्याच्या हातांतला हारा दूर केला आहे.


त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा लादून त्यांना जेरीस आणावे, ह्या हेतूने त्यांच्यापासून बिगारकाम करून घेणारे मुकादम नेमले. तेव्हा त्यांनी फारोसाठी पिथोम व रामसेस ही कोठारांची नगरे बांधली;


म्हणून मिसरी लोक इस्राएलवंशजांपासून सक्तीने काम घेऊ लागले;


दोन इब्री सुइणी होत्या; एकीचे नाव शिप्रा व दुसरीचे नाव पुवा; त्यांना मिसरच्या राजाने आज्ञा केली की,


बराच काळ लोटल्यावर मिसराचा राजा मृत्यू पावला; इकडे इस्राएलवंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत, आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेली आरोळी वर देवापर्यंत जाऊन पोहचली.


ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे.


मोशेने हे सारे इस्राएल लोकांना सांगितले; पण ते आपल्या मनाच्या संतापामुळे आणि बिकट दास्यामुळे मोशेचे ऐकेनात.


गरीब प्रजेवरचा दुष्ट अधिपती गर्जणार्‍या सिंहासारखा आणि भक्ष्य शोधत फिरणार्‍या अस्वलासारखा आहे.


ह्यास्तव प्रभू, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “हे माझे सीयोननिवासी प्रजे, अश्शूर मिसराप्रमाणे तुला दंडाने ताडन करील व तुझ्यावर सोटा उचलील, तरी त्याला भिऊ नकोस.


ज्या पीडा करणार्‍यांनी तुझ्या जिवाला म्हटले, खाली वाक म्हणजे आम्ही तुझ्यावरून चालून जाऊ, आणि तुझ्यावरून ज्या चालणार्‍यांसाठी तू आपली पाठ, भूमी व रस्ता अशी केली, त्यांच्या हाती मी तो प्याला देईन.”


परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांना फुकट धरून नेले आहे, आणि आता मी येथे काय करू? परमेश्वर म्हणतो, त्यांच्यावर प्रभूत्व करणारे गर्जना करीत आहेत, दिवसभर एकसारखी माझ्या नामाची निंदा होत आहे.


दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, जुवाच्या दोर्‍या सोडाव्यात, जाचलेल्यांना मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय?


कठोरपणाने त्याच्यावर अधिकार चालवू नकोस, पण आपल्या देवाचे भय धर.


त्यांचा ताबा तुम्ही आपल्यामागे आपल्या मुलांना द्यावा, व ती त्यांच्या वतनाचा भाग ठरतील; त्या लोकांतून तुम्ही कायमचे दास करून घ्यावेत, पण तुमच्या इस्राएल भाऊबंदांनी एकमेकांवर आपला अधिकार कठोरपणाने चालवू नये.


त्याने आपल्या धन्याजवळ सालदाराप्रमाणे राहावे; त्याच्या धन्याने तुमच्यासमोर त्याच्यावर कठोरपणे अधिकार चालवू नयेत.


तुम्ही माझ्या लोकांचे मांस खाता, त्यांच्यावरचे कातडे सोलून काढतात, बहुगुण्यात टाकलेल्या किंवा कढईत असलेल्या मांसाच्या तुकड्यांप्रमाणे त्यांची हाडे मोडून तुकडे-तुकडे करतात.


वेढा पडणार म्हणून पाणी भरून ठेव; तुझे किल्ले मजबूत कर, चिखलात उतर, पायांनी गारा तुडव, विटाळे हाती घे.


म्हणजे आमचे पूर्वज मिसर देशात गेले होते, तेथे आम्ही दीर्घकाळ राहिलो; आणि मिसरी लोकांनी आम्हांला व आमच्या पूर्वजांना छळले;


तो राजा आपल्या ‘लोकांबरोबर कपटाने वागला’ आणि त्यांची बालके ‘जगू’ नयेत म्हणून ती बाहेर टाकून देण्यास त्याने त्यांना भाग पाडले; असे त्याने आपल्या पूर्वजांना ‘छळले’.


मिसर देशातल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे, त्यांचे हुंदके मी ऐकले आहेत आणि त्यांना सोडवून घेण्यासाठी मी उतरलो आहे; तर आता चल, मी तुला मिसर देशात पाठवतो.’


तेथे मिसरी लोकांनी आम्हांला निर्दयतेने वागवले, गांजले व आम्हांला वेठीस लावले;


तुम्ही आज आहात त्याप्रमाणे परमेश्वराची खास1 प्रजा व्हावे म्हणून त्याने तुम्हांला लोखंडी भट्टीतून, म्हणजे मिसर देशातून बाहेर काढले आहे.


ती त्यांना म्हणाली, “मला नामी (मनोरमा) म्हणू नका तर मारा (क्लेशमया) म्हणा; कारण सर्वसमर्थाने मला फारच क्लेश दिला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan