Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 1:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा लादून त्यांना जेरीस आणावे, ह्या हेतूने त्यांच्यापासून बिगारकाम करून घेणारे मुकादम नेमले. तेव्हा त्यांनी फारोसाठी पिथोम व रामसेस ही कोठारांची नगरे बांधली;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 म्हणून त्याने त्यांना कामाच्या ओझ्याने जाचण्यासाठी त्यांच्यावर मुकादम नेमले. त्यांनी फारोकरता पिथोम व रामसेस ही दोन शहरे इस्राएल लोकांकडून बांधून घेतली;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 म्हणून त्यांनी इस्राएली लोकांवर गुलाम मुकादम ठेवले व त्यांच्याकडून जुलमाने फारोहसाठी पीथोम व रामसेस ही भंडारांची नगरे बांधून घेतली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 1:11
21 Iomraidhean Croise  

परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू निश्‍चितपणे समज की जो देश स्वत:चा नाही, अशा देशात तुझे संतान उपरे होऊन राहील व तेथील लोकांचे दास्य करील, आणि ते लोक चारशे वर्षे त्यांना छळतील.


नंतर योसेफाने आपला बाप व भाऊ ह्यांच्या राहण्याची व्यवस्था केली; त्याने फारोच्या आज्ञेनुसार मिसर देशाच्या उत्तम भागात म्हणजे रामसेस प्रांतात त्यांना वतन करून दिले.


ह्याखेरीज आणखी भांडारासाठी आणि रथ व स्वार ह्यांच्यासाठी नगरे बांधली आणि तसेच यरुशलेमेत, लबानोनावर व आपल्या सर्व राज्यात आपल्या मनास आले तेही सर्व त्याने बांधले.


आसा राजाचे हे बोलणे मान्य करून बेन-हदादाने आपल्या सैन्याच्या सरदारांना इस्राएली नगरांवर स्वारी करायला पाठवले; त्यांनी ईयोन, दान, आबेल-मईम व नफतालीची सर्व भांडारनगरे जिंकली.


त्याने रानातील तदमोर आणि हमाथातील सर्व भांडारनगरे ह्यांची मजबुती केली.


ते राष्ट्राराष्ट्रांतून, एका राज्यातून दुसर्‍या लोकांत हिंडले.


आता इस्राएलाने म्हणावे की, “माझ्या तरुणपणापासून त्यांनी मला फार पिडले आहे;”


“माझ्या तरुणपणापासून त्यांनी मला फार पिडले आहे, तरी माझ्याविरुद्ध त्यांचे काही चालले नाही.


तुम्ही मेंढवाड्यामध्ये1 पडून राहता काय? ज्याचे पंख रुप्याने व पिसे पिवळ्या सोन्याने मंडित आहेत, अशा कबुतरासारखे तुम्ही आहात ना?


“मी त्याच्या खांद्यावरील भार काढला आहे; त्याच्या हातांतला हारा दूर केला आहे.


त्यांना मातीचा गारा व विटा करायला आणि शेतात हरतर्‍हेची कामे करायला लावत. असल्या बिकट कामाने त्यांना जीव नकोसा झाला; कारण ही सर्व कामे मोठ्या सक्तीची असत.


काही दिवसांनी असे झाले की मोशे मोठा झाल्यावर त्याने आपल्या भाऊबंदांकडे जाऊन त्यांचे काबाडकष्ट पाहिले; त्या प्रसंगी आपल्या भाऊबंदांपैकी एका इब्र्याला कोणी मिसरी मारत असलेला त्याला दिसला.


परमेश्वर म्हणाला, “मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे, त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे; त्यांचे क्लेश मी जाणून आहे;


मग लोकांचे मुकादम व नायक बाहेर जाऊन त्यांना म्हणाले, “फारो म्हणतो, मी तुम्हांला गवत पुरवणार नाही.


तेव्हा इस्राएल लोकांचे नायक फारोकडे जाऊन ओरड करून म्हणाले, “आपण आपल्या दासांशी असे का वागता?


तरी आजवर जेवढ्या विटा त्यांना कराव्या लागत होत्या तेवढ्या त्यांच्याकडून करवून घ्या, त्यात काही कमी करू नका; ते आळशी आहेत, म्हणून ते ओरड करीत आहेत की आम्हांला जाऊ द्या, आमच्या देवाला यज्ञ करू द्या.


क्रोधाची निष्ठुरता व कोपाचा तडाखा ही पुरवली पण प्रेमसंशयापुढे कोण टिकेल?


म्हणजे आमचे पूर्वज मिसर देशात गेले होते, तेथे आम्ही दीर्घकाळ राहिलो; आणि मिसरी लोकांनी आम्हांला व आमच्या पूर्वजांना छळले;


तेथे मिसरी लोकांनी आम्हांला निर्दयतेने वागवले, गांजले व आम्हांला वेठीस लावले;


Lean sinn:

Sanasan


Sanasan