Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 9:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 इकडे यहूदी लोकांनी आपल्या सर्व शत्रूंवर तलवार चालवून त्यांचा वध व विध्वंस केला; मनास येईल तसा त्यांनी आपल्या विरोध्यांचा समाचार घेतला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 यहूद्यांनी आपल्या सर्व शत्रूंचा पाडाव केला. तलवार चालवून त्यांनी शत्रूला ठार केले व शत्रूंचा विध्वंस केला. आपला तिरस्कार करणाऱ्या शत्रूचा आपल्या इच्छेप्रमाणे समाचार घेतला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 त्या नेमलेल्या दिवशी यहूदी लोकांनी आपल्या शत्रूंची कत्तल करून संहार केला व त्यांचा नाश केला आणि जे त्यांचा तिरस्कार करीत असत, त्यांना आवडेल तसे वागविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 9:5
11 Iomraidhean Croise  

त्याप्रमाणेच त्यांच्या वंशजांनी त्या देशात जाऊन त्याचा ताबा घेतला; तू त्यांच्यादेखत देशातले कनानी रहिवासी ह्यांना पादाक्रांत केले; त्यांचे राजे व देशाचे लोक ह्यांचे वाटेल ते करावे म्हणून त्यांना तू त्यांच्या हाती दिलेस.


राजाच्या सर्व प्रांताप्रांतांतून जासुदांच्या हस्ते अशा आशयाची पत्रे पाठवण्यात आली की, एकाच दिवशी म्हणजे बाराव्या अदार महिन्याच्या त्रयोदशीस वृद्ध, तरुण, स्त्रिया, मुले अशा सर्व यहूदी लोकांचा विध्वंस, संहार व नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती लुटून घ्यावी.


त्या पत्रांत सर्व नगरांच्या यहूद्यांना परवानगी दिली होती की, ‘तुम्ही एकत्र होऊन आपल्या प्राणांचे संरक्षण करण्यास उभे राहावे आणि ज्या ज्या प्रांतातील लोक जबरदस्त होऊन तुम्हांला, तुमच्या स्त्रियांना व तुमच्या मुलाबाळांना उपद्रव देऊ पाहतील त्यांचा विध्वंस, संहार व नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती लुटावी.


शूशन राजवाड्यात यहूदी लोकांनी पाचशे लोकांचा वध करून त्यांचा धुव्वा उडवला.


नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल.


ह्यामुळे त्यांचे पुत्र दुष्काळात सापडू दे; त्यांना तलवारीच्या तडाक्यात सापडू दे; त्यांच्या स्त्रिया अपत्यहीन व विधवा होवोत, मृत्यू त्यांचे पुरुष ठार करो; त्यांचे तरुण लढाईत तलवारीने पडोत.


तुमच्यावर संकट आणणार्‍या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणार्‍या तुम्हांला आमच्याबरोबर विश्रांती देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे,


Lean sinn:

Sanasan


Sanasan