Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 9:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 प्रांतांचे सरदार, इलाख्याचे अधिपती, प्रांतांचे अधिपती व राज्यकारभार चालवणारे सर्व जण ह्यांनी यहूद्यांना कुमक केली; त्या सर्वांना मर्दखयाचा धाक बसला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 शिवाय, सर्व प्रांतामधले अधिकारी, अधिपती, सरदार, आणि राजाचे कारभारी यांनी यहूद्यांना सहाय्य केले, कारण ते सगळे मर्दखयाला घाबरत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 सर्व प्रांतांच्या अधिपतींनी म्हणजे राज्यपाल, प्रांतप्रमुख, प्रतिष्ठित व सरकारी कर्मचाऱ्यांनी यहूद्यांनाच मदत केली, कारण ते मर्दखयाच्या भीतीने ग्रासून गेले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 9:3
9 Iomraidhean Croise  

जरूब्बाबेलबरोबर आले ते येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम, बाना. इस्राएल लोकांतल्या मनुष्यांची ही मोजदाद आहे :


मग त्यांनी राजाचे फर्मान महानदाच्या पश्‍चिमेकडील प्रांतांवरील राजाचे मुतालिक व प्रांताधिपती ह्यांना दिले; त्यांनी इस्राएल लोकांना देवाच्या मंदिराच्या कामी साहाय्य केले.


तेव्हा पहिल्या महिन्याच्या त्रयोदशीस राजाचे लेखक बोलावण्यात आले आणि राजाचे प्रतिनिधी, प्रत्येक प्रांताचे सुभे व सगळ्या लोकांचे सरदार ह्यांना हामानाच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक प्रांताच्या लिपीत व प्रत्येक जातीच्या लोकांच्या भाषेत (खलिते) लिहून पाठवण्यात आले. अहश्वेरोश राजाच्या नावाने ते लिहून त्यांवर राजाची मोहर केली होती.


ज्या प्रांतात व ज्या नगरात राजाची आज्ञा व फर्मान जाऊन पोहचले तेथल्या यहूद्यांना मोठा हर्ष झाला आणि त्यांनी भोजनसमारंभ करून तो मंगलदिन म्हणून पाळला आणि त्या देशाचे पुष्कळ लोक यहूदी झाले, कारण त्यांना यहूद्यांचा मोठा धाक बसला.


ती म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आल्यास, माझ्यावर त्यांची कृपादृष्टी झाली असल्यास, त्यांना योग्य दिसल्यास व मी त्यांच्या आवडीची असल्यास, महाराजांच्या सर्व प्रांतांत जे यहूदी आहेत त्यांचा नायनाट करण्याविषयी अगागी हामान बिन हम्मदाथा ह्याने जी पत्रे लिहून पाठवली आहेत ती रद्द व्हावीत असे फर्मान पाठवण्यात यावे.


त्या वेळेस शिवान महिन्याच्या म्हणजे तिसर्‍या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी राजाच्या लेखकांना बोलावण्यात आले आणि मर्दखयाच्या सांगण्याप्रमाणे इस्राएलाच्या अधिपतींना आणि हिंदुस्तानापासून कूश देशापर्यंतच्या एकशे सत्तावीस परगण्यांचे अधिपती व सरदार ह्यांना प्रत्येक प्रांताच्या लिपीत व निरनिराळ्या लोकांच्या भाषांत आणि यहूद्यांना त्यांच्या लिपीत व भाषेत खलिते पाठवण्यात आले.


ही जी मूर्ती नबुखद्नेस्सर राजाने स्थापली होती तिची प्रतिष्ठापना करण्यासाठी त्याने राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुभ्यांचे सर्व अधिकारी ह्यांनी एकत्र जमावे म्हणून त्यांना बोलावणे केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan