Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 9:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 पण राजाच्या लक्षात हे प्रकरण येऊन त्याने लेखी हुकूम केला ह्यावरून हामानाने जे कपटकारस्थान यहूदी लोकांविरुद्ध योजले होते ते त्याच्याच माथी उलटले आणि तो व त्याचे पुत्र फाशीच्या खांबांवर टांगण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 परंतु राजासमोर ही गोष्ट आली तेव्हा त्याने अशी लिखीत आज्ञा काढली की, कपटी हामानाने यहूदी लोकांविरूद्ध रचलेल्या कारस्थानाचा दोष त्यांच्या माथी मारावा आणि त्यास व त्याच्या पुत्रांना फाशी देण्यात यावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 या कटाचे प्रकरण राजापुढे आले, तेव्हा राजाने फर्मान काढले की यहूदी लोकांविरुद्ध रचलेला हामानाचा कट त्याच्याच डोक्यावर उलटविण्यात यावा आणि मग हामान व त्याचे पुत्र यांना फासावर लटकविण्यात यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 9:25
19 Iomraidhean Croise  

तर तू स्वर्गलोकातून ती श्रवण कर, आणि त्याप्रमाणे घडवून आण; आपल्या सेवकांचा न्याय करून दुष्टांना दुष्ट ठरव आणि ज्याचे कर्म त्याच्या माथी येऊ दे; निर्दोष्यास निर्दोषी ठरवून त्याच्या निर्दोषतेप्रमाणे त्याला फळ दे.


एकट्या मर्दखयावर हात टाकणे हे त्याला त्याच्या दृष्टीने कमीपणाचे वाटले, कारण मर्दखय कोणत्या जातीचा आहे हे त्यांनी हामानास सांगितले होते; त्यामुळे अहश्वेरोशाच्या अवघ्या साम्राज्यातील मर्दखयाचे लोक म्हणजे सर्व यहूदी लोक ह्यांचा नायनाट करण्याचा बेत हामानाने केला.


तेव्हा जो खांब मर्दखयासाठी हामानाने तयार केला होता त्यावर त्यालाच फाशी दिले. तेव्हा राजाच्या क्रोधाचे शमन झाले.


माझा व माझ्या लोकांचा विध्वंस, संहार व नायनाट व्हावा ह्या हेतूने आमची विक्री होऊन चुकली आहे; आम्ही केवळ दासदासी व्हावे ह्या हेतूने आमची विक्री झाली असती तर मी गप्प राहिले असते; तरी त्या स्थितीतही त्या वैर्‍याला राजाच्या नुकसानीची भरपाई करता आली नसती.”


अहश्वेरोश राजाने एस्तेर राणीला विचारले, “असे करण्याचे धाडस करणारा कोण व तो कोठे आहे?”


हे परमेश्वरा, दुर्जनाच्या इच्छा पुरवू नकोस, त्याची दुष्ट योजना सिद्धीस जाऊ देऊ नकोस; नाहीतर तो उन्मत्त होईल. (सेला)


ज्यांनी मला घेरले आहे त्यांच्या वाचेपासून होणारा अनर्थ त्यांच्याच शिरी पडो.


दुर्जन आपल्याच जाळ्यात पडोत; मी तर त्यातून साफ निसटून जाईन.


त्याने केलेला उपद्रव त्याच्याच शिरी पडेल; त्याचा जुलूम त्याच्याच माथी येईल.


परमेश्वराच्या न्यायपरायणतेमुळे मी त्याची स्तुती करीन; परात्पर परमेश्वराच्या नावाचे स्तोत्र गाईन.


तो त्यांची अनीती त्यांच्यावरच उलटवील; त्यांच्या दुष्टपणामुळे तो त्यांना नाहीसे करील; आमचा देव परमेश्वर त्यांना नाहीसे करील.


जो खाच खणतो तो तिच्यात पडेल, जो धोंडा लोटतो त्याच्यावर तो उलट येईल.


दुर्जनाला त्याची स्वत:चीच दुष्कर्मे पछाडतात; तो आपल्याच पापाच्या पाशात सापडतो.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी मजबूत ठिकाणी बसेलली खुंटी ढळेल; ती कापली जाऊन खाली पडेल व तिच्यावरील भार छेदला जाईल;’ कारण परमेश्वर हे बोलला आहे.”


कारण परमेश्वराचा दिवस सर्व राष्ट्रांना समीप येऊन ठेपला आहे; तू केलेस तसे तुला करतील; तुझी करणी तुझ्याच डोक्यावर उलटेल.


[जो ह्या धोंड्यावर पडेल त्याचा चुराडा होईल, परंतु ज्या कोणावर हा पडेल त्याचा हा भुगाभुगा करून टाकील.]”


नाबालाच्या मृत्यूचे वृत्त ऐकून दावीद म्हणाला, “नाबालाच्या हातून माझी अप्रतिष्ठा झाली तिची दाद ज्याने घेतली आणि आपल्या दासाला घात करण्यापासून आवरले, तो परमेश्वर धन्य! परमेश्वराने नाबालाचे दुष्कर्म त्याच्याच शिरी उलटवले.” मग दाविदाने अबीगईलेशी लग्नाचे बोलणे करण्यासाठी तिच्याकडे लोक पाठवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan