Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 9:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 आणि अदार महिन्याचा चौदावा व पंधरावा हे दिवस वर्षोवर्षी पाळत जावे असे फर्मावले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 दरवर्षी अदार महिन्याचा चौदावा आणि पंधरावा दिवसही अगत्याने पाळावा,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 या पत्रांच्या द्वारे अदार महिन्याच्या चौदाव्या व पंधराव्या दिवशी वार्षिक आनंदोत्सव म्हणून जाहीर केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 9:21
8 Iomraidhean Croise  

ते मंदिर दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या सहाव्या वर्षी अदार महिन्याच्या तृतीयेस पुरे झाले.


अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी त्यांनी पहिल्या म्हणजे नीसान महिन्यापासून हामानासमक्ष पूर (चिठ्ठ्या) टाकायला लावल्या. हा क्रम दररोज, दरमहा, बारावा महिना अदार संपेपर्यंत चालू राहिला.


अदार महिन्याच्या त्रयोदशीस हे घडले; त्यांनी चतुर्दशीस विश्रांती घेऊन तो दिवस मेजवानीचा व आनंदोत्सवाचा ठरवला;


पण शूशन येथले यहूदी तेरावा व चौदावा अशा दोन दिवशी एकत्र झाले आणि पंधराव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेऊन तो दिवस मेजवानीचा व आनंदोत्सवाचा ठरवला.


मग मर्दखयाने हे सर्व वृत्त लिहून काढले आणि अहश्वेरोश राजाच्या दूरच्या व जवळच्या सर्व प्रांतांतील यहूदी लोकांना पत्रे पाठवली.


ह्या दिवशी यहूद्यांना आपल्या शत्रूंपासून विसावा प्राप्त झाला, ह्या महिन्यात दु:ख जाऊन आनंद झाला, आणि शोक जाऊन शुभदिन प्राप्त झाला, म्हणून तो पाळावा; हे दिवस आनंदोत्सव करण्यात, एकमेकांना भेटीची ताटे पाठवण्यात व गोरगरिबांना दानधर्म करण्यात घालवावेत.


यहूदी लोकांनी आपणांसाठी, आपल्या वंशजांसाठी व जे त्यांना सामील झाले होते त्यांच्यासाठी असा अढळ नियम व प्रतिज्ञा केली की, त्या लेखानुसार प्रत्येक वर्षी नेमलेल्या समयानुसार हे दोन दिवस पाळावेत.


ह्या दुसर्‍या पत्रानुसार पुरीम पाळण्याचे मंजूर व्हावे म्हणून अबीहाइलाची कन्या एस्तेर राणी हिने आणि मर्दखय यहूदी ह्याने आपल्या अधिकाराने फर्मान लिहिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan