18 परंतु शूशनमधील यहूदी अदार महिन्याच्या तेराव्या आणि चौदाव्या दिवशी एकत्र आले होते. मग पंधराव्या दिवशी त्यांनी आराम केला. पंधरावा दिवस त्यांनी मेजवाणीचा व आनंदोत्सवाचा ठरविला.
18 परंतु शूशन शहरातील यहूदी तेराव्या व चौदाव्या दिवशी एकत्र आले व पंधराव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली आणि हा दिवस मेजवान्या व आनंद करून साजरा केला.
त्या पत्रांत सर्व नगरांच्या यहूद्यांना परवानगी दिली होती की, ‘तुम्ही एकत्र होऊन आपल्या प्राणांचे संरक्षण करण्यास उभे राहावे आणि ज्या ज्या प्रांतातील लोक जबरदस्त होऊन तुम्हांला, तुमच्या स्त्रियांना व तुमच्या मुलाबाळांना उपद्रव देऊ पाहतील त्यांचा विध्वंस, संहार व नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती लुटावी.
अदार जो बारावा महिना त्याच्या त्रयोदशीस राजाची आज्ञा व फर्मान अंमलात येऊन यहूदी लोकांवर वरचढ होण्याचा आशेचा दिवस समीप आला, पण सर्व उलट होऊन यहूदी लोक आपल्या वैर्यांवर वरचढ झाले;
एस्तेर म्हणाली, “राजाची मर्जी असल्यास आजच्या हुकमाप्रमाणे उद्याही करण्यास शूशन येथील यहूद्यांना मुभा असावी आणि हामानाच्या दहा पुत्रांना फाशी देण्याच्या खांबांवर लटकवावे.”
आपणांस उपद्रव करू पाहणार्या वैर्यांना हात दाखवावा म्हणून अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतांतील यहूदी लोक आपापल्या गावी एकत्र झाले; त्यांच्याशी कोणालाही सामना करवेना; त्यांचा सर्व लोकांना धाक बसला.