एस्तेर 9:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 अदार महिन्याच्या त्रयोदशीस हे घडले; त्यांनी चतुर्दशीस विश्रांती घेऊन तो दिवस मेजवानीचा व आनंदोत्सवाचा ठरवला; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 अदार महिन्याच्या तेराव्या दिवशी हे घडले चौदाव्या दिवशी यहूद्यांनी विश्रांती घेतली आणि तो दिवस त्यांनी आनंदोत्सवाचा व मेजवाणीचा ठरविला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 हे अदार महिन्याच्या तेराव्या दिवशी घडले, मग चौदाव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली आणि हा दिवस मेजवान्या व आनंद करून साजरा केला. Faic an caibideil |
त्या वेळेस शिवान महिन्याच्या म्हणजे तिसर्या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी राजाच्या लेखकांना बोलावण्यात आले आणि मर्दखयाच्या सांगण्याप्रमाणे इस्राएलाच्या अधिपतींना आणि हिंदुस्तानापासून कूश देशापर्यंतच्या एकशे सत्तावीस परगण्यांचे अधिपती व सरदार ह्यांना प्रत्येक प्रांताच्या लिपीत व निरनिराळ्या लोकांच्या भाषांत आणि यहूद्यांना त्यांच्या लिपीत व भाषेत खलिते पाठवण्यात आले.
तेव्हा पहिल्या महिन्याच्या त्रयोदशीस राजाचे लेखक बोलावण्यात आले आणि राजाचे प्रतिनिधी, प्रत्येक प्रांताचे सुभे व सगळ्या लोकांचे सरदार ह्यांना हामानाच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक प्रांताच्या लिपीत व प्रत्येक जातीच्या लोकांच्या भाषेत (खलिते) लिहून पाठवण्यात आले. अहश्वेरोश राजाच्या नावाने ते लिहून त्यांवर राजाची मोहर केली होती.