एस्तेर 9:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 एस्तेर म्हणाली, “राजाची मर्जी असल्यास आजच्या हुकमाप्रमाणे उद्याही करण्यास शूशन येथील यहूद्यांना मुभा असावी आणि हामानाच्या दहा पुत्रांना फाशी देण्याच्या खांबांवर लटकवावे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 एस्तेर म्हणाली, “राजाची मर्जी असेल तर शूशनमध्ये यहूद्यांना आजच्यासारखेच उद्या करु द्यावे आणि हामानाच्या दहा पुत्रांचे देहही खांबावर टांगावे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेव्हा एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस येत असेल तर, येथे शूशन शहरातील यहूद्यांना उद्याही राजाज्ञेप्रमाणे करण्याची परवानगी द्यावी आणि हामानाच्या दहा पुत्रांची प्रेते खांबावर टांगण्यात यावी.” Faic an caibideil |
त्या पत्रांत सर्व नगरांच्या यहूद्यांना परवानगी दिली होती की, ‘तुम्ही एकत्र होऊन आपल्या प्राणांचे संरक्षण करण्यास उभे राहावे आणि ज्या ज्या प्रांतातील लोक जबरदस्त होऊन तुम्हांला, तुमच्या स्त्रियांना व तुमच्या मुलाबाळांना उपद्रव देऊ पाहतील त्यांचा विध्वंस, संहार व नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती लुटावी.