एस्तेर 9:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तेव्हा राजा एस्तेर राणीला म्हणाला, “यहूद्यांनी शूशन राजवाड्यातले पाचशे पुरुष व हामानाचे दहा पुत्र मारून त्यांचा फडशा उडवला आहे; मग राज्याच्या इतर प्रांतांत त्यांनी काय केले असेल ते कोणास ठाऊक! आता आणखी तुझा काही अर्ज आहे काय? तो मंजूर होईल; आणखी काही मागणे आहे काय? त्याप्रमाणे करण्यात येईल.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तेव्हा राजा एस्तेर राणीला म्हणाला, “हामानाच्या दहा पुत्रासहीत यहूद्यांनी शूशनमध्ये पाचशे लोकांस मारले. आता राजाच्या इतर प्रांतांत काय करावे अशी तुझी इच्छा आहे? तुझी काय विनंती आहे? ती मान्य करण्यात येईल. तुझी काय मागणी आहे? ती तुझ्यासाठी मान्य करण्यात येईल.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तेव्हा त्याने एस्तेर राणीला बोलाविले व तो म्हणाला, “शूशन राजधानीतच यहूद्यांनी पाचशे लोक ठार केले आहेत आणि हामानाच्या दहा पुत्रांचाही संहार केला आहे. तर राज्याच्या इतर प्रांतात त्यांनी काय केले असेल? आता तुझी काय मागणी आहे? ते तुला दिले जाईल. तुझी काय विनंती आहे? ते देखील करण्यात येईल.” Faic an caibideil |