Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 9:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 हे यहूद्यांचा वैरी हामान बिन हम्मदाथा ह्याचे दहा पुत्र त्यांनी ठार केले, पण लुटीस त्यांनी हात लावला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 हे हामानाचे दहा पुत्र होते. हम्मदाथाचा पुत्र हामान यहूद्यांचा शत्रू होता. यहूद्यांनी या सर्वांना ठार केले खरे, पण त्यांची मालमत्ता लुटली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 9:10
20 Iomraidhean Croise  

तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वहाणेचा बंद मी घेणार नाही; मी अब्रामास संपन्न केले असे म्हणायला तुम्हांला कारण न मिळो;


मग याकोबाच्या मुलांनी त्या वध केलेल्यांवरून जाऊन ते नगर लुटले, कारण त्यांनी त्यांची बहीण दीना हिला भ्रष्ट केले होते.


ह्या गोष्टी घडल्यावर अहश्वेरोश राजाने अगागी हामान बिन हम्मदाथा ह्याला बढती देऊन उच्च पदास चढवले व त्याच्याबरोबरच्या सरदारांपेक्षा त्याचे आसन उंच केले.


राजाच्या सर्व प्रांताप्रांतांतून जासुदांच्या हस्ते अशा आशयाची पत्रे पाठवण्यात आली की, एकाच दिवशी म्हणजे बाराव्या अदार महिन्याच्या त्रयोदशीस वृद्ध, तरुण, स्त्रिया, मुले अशा सर्व यहूदी लोकांचा विध्वंस, संहार व नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती लुटून घ्यावी.


आपल्या धनसंपत्तीची थोरवी, आपल्या संततीचा विस्तार, राजाने आपणांस कशी बढती देऊन राजाचे सरदार व सेवक ह्यांच्यावरील उच्च पद दिले, हे सर्व त्याने त्यांना निवेदन केले.


माझा व माझ्या लोकांचा विध्वंस, संहार व नायनाट व्हावा ह्या हेतूने आमची विक्री होऊन चुकली आहे; आम्ही केवळ दासदासी व्हावे ह्या हेतूने आमची विक्री झाली असती तर मी गप्प राहिले असते; तरी त्या स्थितीतही त्या वैर्‍याला राजाच्या नुकसानीची भरपाई करता आली नसती.”


एस्तेर म्हणाली, “हा विरोधी व हा शत्रू कोण म्हणून विचाराल तर हा दुष्ट हामानच.” हे ऐकून राजा व राणी ह्यांच्यापुढे हामान घाबरला;


त्या पत्रांत सर्व नगरांच्या यहूद्यांना परवानगी दिली होती की, ‘तुम्ही एकत्र होऊन आपल्या प्राणांचे संरक्षण करण्यास उभे राहावे आणि ज्या ज्या प्रांतातील लोक जबरदस्त होऊन तुम्हांला, तुमच्या स्त्रियांना व तुमच्या मुलाबाळांना उपद्रव देऊ पाहतील त्यांचा विध्वंस, संहार व नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती लुटावी.


त्या दिवशी शूशन राजवाड्यात ज्यांचा वध झाला त्यांची यादी राजाकडे आणली.


पर्मश्ता, अरीसई, अरीदय व वैजाथा,


त्यांची संतती पृथ्वीवरून व त्यांचे बीज मानवजातीतून तू नाहीसे करशील,


आणि तो म्हणाला, “परमेश्वराच्या सिंहासनावर हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकाशी पिढ्यानपिढ्या युद्ध होईल.”


त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस; कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे; जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना तिसर्‍या-चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो;


तेव्हा ज्या माणसांनी दानिएलावर आरोप आणला होता त्यांना राजाज्ञेवरून पकडून आणले आणि त्यांना व त्यांच्या बायकामुलांना सिंहांच्या गुहेत टाकले; तेव्हा ते सिंहांच्या तडाक्यात सापडून त्या गुहेच्या तळाशी पोहचण्यापूर्वीच सर्वांच्या हाडांचा त्यांनी चुराडा केला.


वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व माणसांच्या दृष्टीने जे सात्त्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा.


बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदर णीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‍गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan