एस्तेर 9:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 अदार जो बारावा महिना त्याच्या त्रयोदशीस राजाची आज्ञा व फर्मान अंमलात येऊन यहूदी लोकांवर वरचढ होण्याचा आशेचा दिवस समीप आला, पण सर्व उलट होऊन यहूदी लोक आपल्या वैर्यांवर वरचढ झाले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आता बाराव्या महिन्याच्या म्हणजे अदार महिन्याच्या तेराव्या दिवशी लोकांस राजाच्या आज्ञेचे व हुकूमाचे पालन करायचे होते, यहूद्यांच्या शत्रूंनी त्यांच्यावर वरचढ होण्याची आशा धरली होती पण त्याच्या उलट झाले, जे यहूद्यांचा द्वेष करत होते त्या शत्रूंपेक्षा यहूदी आता वरचढ झाले होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 बाराव्या म्हणजे अदार महिन्याच्या तेराव्या दिवशी, राजाची दोन्हीही फर्माने अंमलात यावयाची होती. त्या दिवशी यहूद्यांचे शत्रू यहूद्यांना धुळीस मिळविण्याची आशा बाळगून होते. परंतु प्रत्यक्षात अगदी उलटेच घडले. सर्व प्रांतांतील यहूदी लोक, त्यांना उपद्रव देणाऱ्यांना वरचढ झाले. Faic an caibideil |