एस्तेर 8:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तुम्हांला वाटेल त्याप्रमाणे राजाच्या नावाने यहूद्यांविषयी लिहा, आणि पत्रावर राजाची मोहर करा; राजाच्या नावाने लिहिलेले लेख व त्यांवर झालेली राजाची मोहर कोणालाही रद्द करता येणार नाही.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आता राजाच्या नावाने यहूद्यांविषयी दुसरा आदेश लिहा आणि मग त्या हुकमावर राजाची मोहर उमटवा. कारण राजाच्या नावाने लिहिलेले लेख आणि त्यावर झालेली राजाची मोहर कोणालाही रद्द करता येत नाही.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आता तुम्ही राजाच्या नावाने यहूद्यांच्या वतीने तुम्हाला योग्य वाटेल तशी दुसरी राजाज्ञा लिहा आणि त्यावर राजाची मोहोर लावा—कारण राजाच्या नावाने लिहिलेले व राजाची मोहोर लावलेले पत्र कधीही रद्द होत नाही.” Faic an caibideil |
तेव्हा पहिल्या महिन्याच्या त्रयोदशीस राजाचे लेखक बोलावण्यात आले आणि राजाचे प्रतिनिधी, प्रत्येक प्रांताचे सुभे व सगळ्या लोकांचे सरदार ह्यांना हामानाच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक प्रांताच्या लिपीत व प्रत्येक जातीच्या लोकांच्या भाषेत (खलिते) लिहून पाठवण्यात आले. अहश्वेरोश राजाच्या नावाने ते लिहून त्यांवर राजाची मोहर केली होती.
ती म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आल्यास, माझ्यावर त्यांची कृपादृष्टी झाली असल्यास, त्यांना योग्य दिसल्यास व मी त्यांच्या आवडीची असल्यास, महाराजांच्या सर्व प्रांतांत जे यहूदी आहेत त्यांचा नायनाट करण्याविषयी अगागी हामान बिन हम्मदाथा ह्याने जी पत्रे लिहून पाठवली आहेत ती रद्द व्हावीत असे फर्मान पाठवण्यात यावे.