Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 8:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 ज्या प्रांतात व ज्या नगरात राजाची आज्ञा व फर्मान जाऊन पोहचले तेथल्या यहूद्यांना मोठा हर्ष झाला आणि त्यांनी भोजनसमारंभ करून तो मंगलदिन म्हणून पाळला आणि त्या देशाचे पुष्कळ लोक यहूदी झाले, कारण त्यांना यहूद्यांचा मोठा धाक बसला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 ज्या प्रांतात आणि ज्या नगरात राजाची आज्ञा पोहोचली तिथे यहूद्यांमध्ये आनंद झाला आणि त्यांनी भोजनसमारंभ करून शुभदिन म्हणून पाळला. त्या देशाचे बरेच लोकही यहूदी झाले. कारण त्यांना यहूद्यांची भीती वाटू लागली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 राजाचे फर्मान ज्या प्रत्येक शहरात आणि प्रत्येक प्रांतात जाऊन पोहोचले तेव्हा तेथील सर्व यहूद्यांनी मेजवान्या देऊन उत्सव साजरा करून आपला हर्ष व उल्हास प्रकट केला. इतर देशातील अनेक लोक यहूदी बनले, कारण यहूदी आपला जबरदस्तीने ताबा घेतील अशी त्यांना भीती वाटली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 8:17
17 Iomraidhean Croise  

मग त्यांनी कूच केले; आणि आसपासच्या नगरांतल्या लोकांच्या मनात देवाने अशी दहशत उत्पन्न केली की ते याकोबाच्या मुलांच्या पाठीस लागले नाहीत.


तेव्हा त्याने त्यांना सांगितले, “जा, मिष्टान्नाचे सेवन करा; गोडगोड पेये प्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा; कारण आजचा दिवस परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहे; तुम्ही उदास राहू नका; कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय.”


अदार महिन्याच्या त्रयोदशीस हे घडले; त्यांनी चतुर्दशीस विश्रांती घेऊन तो दिवस मेजवानीचा व आनंदोत्सवाचा ठरवला;


ह्याकरता खेडेगावचे यहूदी जे गावकूस नसलेल्या गावांत राहतात ते अदार महिन्याची चतुर्दशी आनंदोत्सवाचा मंगलदिन व एकमेकांना भेटीची ताटे पाठवण्याचा दिवस ठरवून पाळतात.


आपणांस उपद्रव करू पाहणार्‍या वैर्‍यांना हात दाखवावा म्हणून अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतांतील यहूदी लोक आपापल्या गावी एकत्र झाले; त्यांच्याशी कोणालाही सामना करवेना; त्यांचा सर्व लोकांना धाक बसला.


ह्या दिवशी यहूद्यांना आपल्या शत्रूंपासून विसावा प्राप्त झाला, ह्या महिन्यात दु:ख जाऊन आनंद झाला, आणि शोक जाऊन शुभदिन प्राप्त झाला, म्हणून तो पाळावा; हे दिवस आनंदोत्सव करण्यात, एकमेकांना भेटीची ताटे पाठवण्यात व गोरगरिबांना दानधर्म करण्यात घालवावेत.


यहूदी लोकांनी आपणांसाठी, आपल्या वंशजांसाठी व जे त्यांना सामील झाले होते त्यांच्यासाठी असा अढळ नियम व प्रतिज्ञा केली की, त्या लेखानुसार प्रत्येक वर्षी नेमलेल्या समयानुसार हे दोन दिवस पाळावेत.


प्रांतांचे सरदार, इलाख्याचे अधिपती, प्रांतांचे अधिपती व राज्यकारभार चालवणारे सर्व जण ह्यांनी यहूद्यांना कुमक केली; त्या सर्वांना मर्दखयाचा धाक बसला होता.


त्यांच्या जाण्याने मिसरी लोकांना आनंद झाला; कारण त्यांना त्यांचे भय पडले होते.


लोकांच्या बखेड्यांपासून तू मला मुक्त केलेस; तू मला राष्ट्रांचा प्रमुख केलेस; जे लोक माझ्या परिचयाचे नव्हते ते माझे अंकित झाले.


भीती व दहशत त्यांना घेरतात; तुझ्या बाहुपराक्रमाने ते दगडाप्रमाणे निश्‍चल झाले आहेत; हे परमेश्वरा, तुझे लोक पार जाईपर्यंत, तू खरेदी केलेली प्रजा पार निघून जाईपर्यंत असे होईल.


तुमच्याशी कोणी सामना करणार नाही; ज्या भूमीवर तुम्ही पाऊल टाकाल तेथल्या रहिवाशांच्या मनात तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमच्याविषयी भीती व दहशत उत्पन्न करील.


सार्‍या नभोमंडळाखालील लोकांच्या मनात आज मी तुझ्याविषयी अशी दहशत आणि भीती उत्पन्न करू लागेन की, ते तुझे वर्तमान ऐकून थरथरा कापतील व तुला घाबरतील.’


हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणीपाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जिवात जीव राहिला नाही; कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे.


आणि त्यांना म्हणाली, “परमेश्वराने हा देश तुम्हांला दिला आहे. आम्हांला तुमची दहशत बसली आहे, आणि देशातील सर्व रहिवाशांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे, हे मला ठाऊक आहे;


आपल्या चाकरांना विचारा म्हणजे ते आपणाला सांगतील; तर ह्या तरुण पुरुषांवर कृपादृष्टी करा; आम्ही आनंदाच्या दिवशी आलो आहोत, तर आपला हात चालेल तेवढे आपल्या दासांना व आपला पुत्र दावीद ह्याला द्या.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan