Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 8:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मग मर्दखय निळ्या, पांढर्‍या रंगाची राजकीय वस्त्रे लेवून, डोक्यांवर सोन्याचा मुकुट ठेवून व तलम सणाचा व जांभळ्या रंगाचा झगा घालून राजासमोरून निघाला; तेव्हा शूशन नगराचे लोक आनंदाने जयघोष करू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मर्दखय राजाकडून निघाला. त्याने राजाकडचा विशेष पोषाख घातला होता. त्याची वस्त्रे निळया आणि पांढऱ्या रंगाची होती. मोठा सोन्याचा मुकुट त्याने घातला होता. तलम सणाचा जांभळा झगा त्याने वर चढवला होता. शूशन नगरामध्ये आनंदाने जयघोष करण्यात आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 जेव्हा मर्दखया राजाच्या उपस्थितीतून बाहेर गेला, तेव्हा त्याने निळ्या व पांढर्‍या रंगांची राजकीय वस्त्रे परिधान केले होते व डोक्यावर सोन्याचा मोठा मुकुट ठेवून आणि व जांभळ्या रंगाचा व तलम वस्त्राचा झगा घातला होता. आणि शूशन शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 8:15
15 Iomraidhean Croise  

मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली, त्याला तलम तागाची वस्त्रे लेववली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली;


तेथील पडदे पांढर्‍या, हिरव्या, व निळ्या रंगाचे होते; हे पडदे तलम सणाच्या व जांभळ्या रंगाच्या दोर्‍यांनी चांदीच्या कड्यांमध्ये अडकवून संगमरवरी खांबांना लावले होते; तेथील मंचक सोन्यारुप्याचे असून तांबड्या, पांढर्‍या, पिवळ्या व काळ्या संगमरवरी पाषाणांच्या फरशीवर ठेवले होते.


त्याच्या सामर्थ्याच्या व पराक्रमाच्या कृत्यांची आणि मर्दखयास राजाने महतीस चढवल्याची साद्यंत हकिकत मेदी व पारसी ह्यांच्या इतिहासाच्या ग्रंथात लिहिली आहे, नाही काय?


हा हुकूम शूशन राजवाड्यात देण्यात आला आणि राजाज्ञेने जासूद त्वरित निघून गेले; त्या प्रसंगी राजा व हामान हे प्यायला बसले; पण शूशन नगर चिंताक्रांत झाले.


तिसर्‍या दिवशी एस्तेर राणी आपली राजकीय वस्त्रे धारण करून राजमंदिराच्या आतल्या चौकात जाऊन राजमंदिरासमोर उभी राहिली; राजा राजमंदिरात सिंहासनावर राजद्वारासमोर बसला होता.


आपल्या धनसंपत्तीची थोरवी, आपल्या संततीचा विस्तार, राजाने आपणांस कशी बढती देऊन राजाचे सरदार व सेवक ह्यांच्यावरील उच्च पद दिले, हे सर्व त्याने त्यांना निवेदन केले.


हामानाने तो पोशाख व तो घोडा घेऊन मर्दखयाला सजवले आणि शहराच्या रस्त्यातून त्याला मिरवून त्याच्यापुढे ललकारले की, “राजेसाहेब ज्याचे गौरव करू इच्छितात त्याची ह्या प्रकारे संभावना होईल.”


महाराज धारण करतात तो पोशाख आणवावा, त्याप्रमाणेच ज्या घोड्यावर महाराज स्वारी करतात तो व महाराजांच्या मस्तकी जो राजमुकुट ठेवतात तो आणवावा;


डाकेच्या स्वारांनी सरकारी वेगवान घोड्यांवर स्वार होऊन राजाज्ञेप्रमाणे त्वरेने दौड केली; हा हुकूम शूशन राजवाड्यातून सोडण्यात आला.


नीतिमानांचे कुशल असते तेव्हा नगर उल्लास पावते, दुर्जन नाश पावतात तेव्हा उत्साह होतो,


नीतिमानांचा विजय होतो तेव्हा मोठा उत्सव होतो, पण दुर्जन प्रबल झाले असता लोक लपून बसतात.


नीतिमान बढती पावतात तेव्हा लोक आनंद पावतात, पण दुर्जन प्रभुत्व चालवतो तेव्हा प्रजा हायहाय करते.


तर मग काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे धारण केलेल्या माणसाला काय? पाहा, तलम वस्त्रे वापरणारे राजवाड्यात असतात.


तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारखाही सजला नव्हता.


कोणीएक श्रीमंत मनुष्य होता; तो जांभळी व तलम वस्त्रे घालत असे, आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करत असे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan